Video : ‘माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार’, जयंत पाटलांच्या विधानानं हास्यकल्लोळ

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी जयंत पाटलांना समोर अनेक समस्या सांगितल्या. काही प्रश्नांवर जयंत पाटलांनी लगोलग तोडगा काढला. पण माकडाच्या संदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर मात्र जयंत पाटलांनी असं उत्तर दिलंय.

Video : 'माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार', जयंत पाटलांच्या विधानानं हास्यकल्लोळ
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 5:19 PM

सांगली : सध्या हनुमान हा विषय राज्यभर चर्चेत आहे. त्यामुळे त्यावर बोलताना सगळेच जपून बोलत आहेत. सर्वसामान्यांपासून ते समाजकारणी, राजकारणी सगळीच मंडळी या प्रकरणावर बोलताना विचारपूर्वक विधान करत आहेत. अचूक टायमिंग साधत करेक्ट कार्यक्रम करणारे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी (Jayant Patil) सध्या माकड आणि हनुमानावर कमेंट केली आहे. ‘माकडाला काय करु शकत नाही आपण, ते हनुमानाचा अवतार’, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या या विधावनंतर एकच हश्या पिकला. ते सांगलीत बोलत होते. याचा व्हीडिओ सध्या चर्चेत (Viral Video) आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटलांनी सध्या माकड आणि हनुमानावर कमेंट केली आहे. माकड हे हनुमानाचा अवतार आहे. आपण त्यांना काय करणार… आता आपण हनुमान चालिसा म्हणतोय आणि त्या माकडांचा काय बंदोबस्त करणार, असं म्हणत जयंत पाटलांनी हनुमान चालिसा प्रकरणावर भाष्य केलंय. त्यांच्या या विधावनंतर एकच हश्या पिकला.

हे सुद्धा वाचा

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्यांने आमच्या भागात माकडांचा त्रास असल्याचं जयंत पाटलांना सांगितलं. तुमच्या भागात झाडं जास्त आहेत. तरी इकडे माकडांचा त्रास नाही. पण आमच्या भागात मात्र आम्हाला खूप माकडांचा त्रास होतोय. यावर काहीतरी योजना करा, असं या शेतकऱ्याने सांगितलं. तेव्हा माकड हनुमानाचा अवतार असल्याने आपण त्यांना काही करू शकत नाही, असं जयंत पाटील उपरोधाने म्हणाले. जयंत पाटलांच्या बोलण्याचा मतितार्थ समोर बसलेल्या लोकांच्या लक्षात आला आणि त्यांना हसू आवरलं नाही. अन् तिथं हास्याचे फवारे उडाले. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकऱ्यांनी जयंत पाटलांना समोर अनेक समस्या सांगितल्या. काही प्रश्नांवर जयंत पाटलांनी लगोलग तोडगा काढला. पण माकडाच्या संदर्भात विचारलेल्या या प्रश्नावर मात्र जयंत पाटलांनी असं हटके उत्तर दिलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.