AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टात हजर राहण्याचे समन्स, काय आहे प्रकरण

Ajit Pawar News: अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टात हजर राहण्याचे समन्स, काय आहे प्रकरण
ajit pawar
| Updated on: Nov 21, 2024 | 4:40 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. सातत्याने प्रचार दौऱ्यावर असलेल्या नेत्यांना दोन दिवस विश्रांती आहे. आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आली आहे. अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

२०१४ विधानसभा निवडणुकीच्या मतदार संघातील हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

आता अजित पवार यांना कोर्टाचे समन्स

अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले.

२०१४ च्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. प्रचार करत होते. परंतु दहा वर्षानंतर कोर्टात सुनावणीस आलेल्या या प्रकरणात आता बरेच बदल झाले आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे विरोधात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.