AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय वेबसीरिज सुरू केलीय का? जितेंद्र आव्हाड भाजप नेत्यावर संतापले, ऑपरेशन सिंदूरच्या ‘त्या’ ट्वीटबद्दल काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींच्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबत भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केलेल्या ट्वीटवरून वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या "सीझन १ संपला" या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि रोहिणी खडसे यांनी तीव्र टीका केली. आव्हाड आणि खडसे यांनी भातखळकरांच्या विधानाला वेबसीरिजशी तुलना करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या वादात राष्ट्रीय राजकारणातील संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा रंगली आहे.

काय वेबसीरिज सुरू केलीय का? जितेंद्र आव्हाड भाजप नेत्यावर संतापले, ऑपरेशन सिंदूरच्या 'त्या' ट्वीटबद्दल काय म्हणाले?
| Updated on: May 13, 2025 | 1:38 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराबाबत देशाला संबोधित केले. यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी “ऑपरेशन सिंदूरचा सीझन-1 संपला, पुढच्या सीझनची प्रतीक्षा” असे ट्वीट केले होते. त्यांच्या या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी मोदींच्या भाषणाबद्दल भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज रात्री आठ वाजता केलेल्या भाषणाचा अर्थ केवळ एवढाच आहे ‘ऑपरेशन सिंदूर’चा ‘सीझन-1’ संपलेला आहे पुढच्या ‘सीझन’ची भारतीयांना प्रतीक्षा असेल…,भारत माता की जय !, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी म्हटले होते. आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी भातखळकरांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिले होते. “काय वेब सीरिज सुरू केलीय का? वारंवार आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसण्याची वाट पाहणाऱ्यांची आता जनताच गय करणार नाही? परत पहेलगाम व्हायची वाट बघता आहात का? आवरते घ्या.” असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले होते.

रोहिणी खडसेंची टीका काय?

त्यासोबतच रोहिणी खडसे यांनीही अतुल भातखळकरांवर टीका केली होती. “तुम्ही काय पुन्हा एकदा पहलगाम व्हावा, पुन्हा माता भगिनींचं कुंकू पुसले जावे याची वाट पाहत आहात का? भाजप आमदारांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. त्यांना वाटतं हे सगळं बिग बॉस, खतरों के खिलाडी यासारखे शो आहेत. म्हणून आता अतुल भातखळकर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या सिजनची वाट पाहत आहेत. आपल्या नेत्याचे कौतुक तुम्ही खुशाल करा, पण त्याला काही मर्यादा असाव्यात.” असे रोहिणी खडसेंनी म्हटले होते.

“मी मागे ही म्हटलं होतं की भाजपच्या आमदारांना कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. त्यांना वाटतं हे सगळं बिग बॉस, खतरों के खिलाडी यासारखे शो आहेत. म्हणून आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या सिजनची वाट पाहत आहेत… अहो अतुलजी, तुम्ही काय पुन्हा एकदा पहलगाम व्हावा, पुन्हा माता भगिनींचं कुंकू पुसले जावे याची वाट पाहत आहात का? आपल्या नेत्याचे कौतुक तुम्ही खुशाल करा पण त्याला काही मर्यादा असाव्यात!”, असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.