Rohit Pawar यांची Facebook पोस्ट चर्चेत, पाहा पोस्टमध्ये नेमकं काय?

| Updated on: Mar 18, 2022 | 6:08 PM

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची एक फेसबुक पोस्ट (Facebook) सध्या चर्चेत आली आहे. वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Follow us on
राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची एक फेसबुक पोस्ट (Facebook) सध्या चर्चेत आली आहे. त्यांनी लिहिले आहे, की जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुले खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही, असे विचारले. मी त्यांना म्हणालो, “वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो. म्हणूनच आपणही वाघासारखेच राहायचे असते आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणत आहे याकडे ढुंकूनही बघायचे नसते. हत्तीसुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडे लक्ष देत नसतो.” हे ऐकून मुलेही म्हणाली, “महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा!”. आता या पोस्टवरून चर्चा सुरू झाल्या आहे.