Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Meeting : राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज रॅपिड बैठक, पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राष्ट्रवादीची तयारी सुरू

राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे. सहाजिकच त्या बैठकीत सध्याची राज्यातली परिस्थिती आणि आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती या बैठकीआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. 

NCP Meeting : राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज रॅपिड बैठक, पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राष्ट्रवादीची तयारी सुरू
पुन्हा ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार, राष्ट्रवादीची तयारी सुरूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 4:41 PM

मुंबई : राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून जोरदार पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे. एकिकडे मशीदीवरील भोंग्याचा (Loudspeaker Row) मुद्दा गाजतोय. तर दुसरीकडे हिंदुत्वावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला आणखी एक दणका दिला आहे. कारण ओबीसी आरक्षणाचं (OBC Reservation) घोंगड सुप्रीम कोर्टात (Supreme Court) भिजत पडलं असताना आता दोन आठवड्यात पुन्हा निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. तर या निवडणुका या पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी या निवडणुकांसाठी कंबर कसताना दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडणार आहे. सहाजिकच त्या बैठकीत सध्याची राज्यातली परिस्थिती आणि आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती या बैठकीआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

विनाआरक्षण निवडणुकीसाठी प्लॅन काय?

गेल्या वेळी पार पडलेल्या निवडणुका या विनाओबीसी आरक्षण पार पडल्या आहेत. त्यामुळे ओबीसींना त्याचा काहीसा फटका तर नक्कीच बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नेहमीच महत्वाची भूमिका बजावत आलंय. मागे पार पडलेल्या ग्रामपंचायची आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणुकींसाठी राष्ट्रवादी काय रणनिती आखते, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच या निवडणुकीत ओबीसींना न्याय देत कोणतं गणित लावलं जाणार, याबाबतही राष्ट्रवादीच्या या बैठकीत चर्चा होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंना थोपवण्यावर चर्चा होणार?

राज्यात सध्या मनसेने रान पेटवलं आहे. अजान ऐकायला आली इकडून मनसे कार्यर्तेही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावत आहे. त्यामुळे राज्यात सध्या हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरही मोठा ताण आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. तसेच सध्या गृहखातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे सध्याच्या पॉलिटिकल राड्यावरही चर्चा होऊ शकते. कुणी कायदा हाहात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पोलीस योग्य ती कारवाई करतील असा इशारा आधीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. मात्र आमच्यासाठी राज ठाकरेंचा आदेश हा सर्वात महत्वाचा आहे. आम्ही हनुमान चालीसा लावणारच अशी भूमिका काही ठिकाणचे मनसे नेते घेताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.