AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगल्यासमोर हजारोचा जमाव, हातात शस्त्र, आमदार क्षीरसागर यांच्या भावाने सांगितला भयानक अनुभव

sandeep kshirsagar | राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय पेटलेला असताना काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवण्यात आलं. काल ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिथे किती भीषण परिस्थिती होती, या बद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांचा भाऊ योगेश क्षीरसागरने माहिती दिलीय.

बंगल्यासमोर हजारोचा जमाव, हातात शस्त्र, आमदार क्षीरसागर यांच्या भावाने सांगितला भयानक अनुभव
Ncp Mla sandeep kshirsagar brother
| Updated on: Oct 31, 2023 | 2:06 PM
Share

बीड (महेंद्रकुमार मुधोळकर)  : मराठा आरक्षण आंदोलनाची धग राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचलीय. राजकीय नेत्यांना या आंदोलनाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. आधीच नेत्यांना मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आलीय. काल मराठा आरक्षण आंदोलन हिंसक बनलं. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवण्यात आलं. त्यावेळी तिथे किती भीषण परिस्थिती होती, ते संदीप क्षीरसागर यांचे बंधु योगेश क्षीरसागर यांनी सांगितलं. घर, गाड्या जाळण हा पूर्वनियोजित कट होता, असं योगेश क्षीरसागर म्हणाले.

“कालचा हल्ला पूर्वनियोजित होता. बंगल्यासमोर चार प्रकारचा जमाव जमला होता. आग लावण्याआधी बंगल्याचा वीज पुरावठा कापण्यात आला. काही लोक घोषणा देत होते. मी खाली आलो, आम्ही गाड्या बाहेर काढल्या. पण पोलिसांनी आत पाठवलं” असं योगेश क्षीरसागर यांनी सांगितंल. “चार प्रकारचा जमाव बंगल्यासमोर जमला होता. घोषणा देणारा एक जमाव होता. दगडफेड करणारा, जाळपोळ करणार आणि हत्यारबंद असा चार प्रकारचा जमाव होता” असं योगेश क्षीरसागर म्हणाले.

‘त्यांना थांबवू नका, अशा सूचना कदाचित असतील’

“चार टोळ्या जमा झालेल्या. 1 हजारपेक्षा जास्त लोक समोर जमले होते. त्यामुळे इथे एवढा विद्धवंस घडला. शहरात 10 ते 12 ठिकाणी जाऊन हे उद्रेक माजवतात. त्यांना रोखणं हे पोलिसांसाठी मोठ काम नाही. पण त्यांना थांबवू नका, अशा सूचना कदाचित पोलिसांना देण्यात आल्या असतील” असं योगेश क्षीरसागर म्हणाले. “नेत्यांची अशी स्थिती असेल, तर सामन्य जनतेने जायचं कुठे? असा सवाल त्यांनी विचारला. काही ठिकाणी बसेस जाळल्या गेल्या. त्यात कोणाचे जीव गेले, नाही गेले हे बघाव लागेल. पण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात बीड जिल्ह्यातील पोलीस अपयशी ठरले” असं योगेश क्षीरसागर म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.