AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधक सरकारला घेरणार, शरद पवार यांचा मोठा निर्णय, पंढरपुरात महत्त्वाची बैठक

मोठी बातमी समोर येत आहे. आता शरद पवार हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

विरोधक सरकारला घेरणार, शरद पवार यांचा मोठा निर्णय, पंढरपुरात महत्त्वाची बैठक
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 4:54 PM
Share

राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम तर हातचा गेला, परंतु आता रब्बी हंगाम देखील संकटात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुष्काळी भागांची पहाणी सुरू आहे. शुक्रवारी राज्य सरकारकडून दुष्काळासंदर्भातील जीआर काढला जाणार आहे. राज्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. जवळपास सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही दुष्काळासंदर्भातील जीआर काढणार आहोत. आपली दुष्काळाची जी संहिता आहे, त्या संहितानुसार ट्रिगर वन प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याचा जो काही शासन आदेश आहे, तो आदेश आम्ही काढणार आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे, ते अमरावतीमध्ये बोलत होते.

दरम्यान दुसरीकडे आता विरोधकांनी देखील राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवा, यासारख्या काही मागण्या विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता स्वत: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार  आहेत.

शरद पवार हे राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा देखील करणार आहेत, परंतु या दौऱ्यापूर्वी शरद पवार हे पंढरपुरात मोर्चा काढणार आहेत. पंढरपुरात शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ मोर्चा काढणार आहेत. येत्या 26 सप्टेंबर रोजी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.  दुष्काळ मोर्चाच्या नियोजनासाठी पंढरपुरात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मात्र या बैठकीला  आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील यांनी दांडी मारली.

वातावरण तापणार 

शरद पवार महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत, परंतु त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला जाणार आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश