AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाडी का? पिंपरी चिंचवडमध्ये पवारांनी खरं कारण सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची कार्यालये तसेच घरांवर आयकर विभाागाने धाड टाकली. या धाडसत्रानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. याच धाडसत्रावर राष्ट्रवादचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.

अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाडी का? पिंपरी चिंचवडमध्ये पवारांनी खरं कारण सांगितलं
SHARAD PAWAR
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 8:18 PM
Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची कार्यालये तसेच घरांवर आयकर विभाागाने धाडी टाकल्या. या धाडसत्रानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. याच धाडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर चांगलाच निशाणा साधला. तसेच अजित पवार यांच्या कुटुंबीयांना का त्रास दिला जातोय याचं नेमकं कारण सांगितलं आहे. “राज्य सरकारमधील अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या. पण ईडी वगैरे काहीही येऊद्या पण सरकार पडणार नाही,” असे शरद पवार म्हणाले.

…म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी

शरद पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ईडी, आयकर विभाग तसेच सीबीायच्या धाडसत्रावर भाष्य केलं. “आधी ईडी, सीबीआय तसेच आयकर विभागाच्या माध्यमातून इतरांना त्रास दिला. आता अजित पवार यांच्या बहिणींना त्रास दिला जात आहे. केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधील अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे समजल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकण्यात आल्या. पण ईडी वगैरे काहीही येऊ द्या. हे सरकार पडणार नाही,” असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

भाजप म्हणून संकट आलंय ते दूर करायचं

तसेच पुढे बोलताना “आता सत्ता त्यांच्या हातात आहे. म्हणून ते काहीही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे. महाराष्ट्र अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांमार्फत त्रास दिला जातो,” असा आरोपदेखील पवार यांनी केला.

इंधन दरवाढीवरुन पवारांचा केंद्रावर निशाणा

महाराष्ट्रातील लोकांची सुख दु:ख समजून घ्यावं हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जात आहे. राज्यात जिथं जाणं शक्य आहे, तिथे जाण्याचा प्रयत्न करणार. एक बातमी पक्की असते की पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किमती किती वाढल्या. आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडेल ही बातमीही असतेच. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा आजचे सत्तेतील लोक आंदोलन करत लोकसभेचं सभागृह बंद पाडत होते. पी. चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितलं की 25 टक्के कर जरी केंद्र सरकारनं कमी केला तरी किंमत कमी होईल. पण केंद्र सरकार ते करताना दिसत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

‘देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे’, शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमधून रणशिंग फुंकलं

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे, ‘भाजपच्या एकला चलो’नंतर जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार

(ncp president sharad pawar criticizes central government on ajit pawar relative it raid)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप