नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी; भुजबळांनी काय दिला इशारा?

भुजबळ म्हणाले की, आपल्या कामकाजामुळे भाजपची हवा देशपातळीवरच कमी झालेली आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या कामकाजामुळे नागरिकांमध्ये देखील जागृती असून, शहरात देखील पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी; भुजबळांनी काय दिला इशारा?
मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार.
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:30 PM

नाशिकः आगामी नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर झाल्या असून, लवकरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. सर्वांची मते जाणून घेण्यात येत असून, सन्मानपूर्वक आघाडीस प्राधान्य देण्यात आहे. मात्र, आघाडी न झाल्यास स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी केली आहे, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आघाडीतील घटकपक्षांना दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी भवन नाशिक येथील कार्यालयात बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.

प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास

छगन भुजबळ म्हणाले की, लवकरच महानगरपालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. आगामी निवडणुका लढताना भाजप वगळता समविचारी पक्ष व गटांशी आघाडी करण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. मात्र, सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत असून, प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास करून नागरिकांची मते जाणून घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपची हवा कमी

भुजबळ म्हणाले की, आपल्या कामकाजामुळे भाजपची हवा देशपातळीवरच कमी झालेली आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या कामकाजामुळे नागरिकांमध्ये देखील जागृती असून, शहरात देखील पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नागरिकांची पसंती असून, पक्षाची शहरात ताकद देखील अधिक वाढली आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्यात येत असून, अधिक गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

पदाधिकाऱ्यांची मते घेतली जाणून

मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी विभागानुसार नेमण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्याचा सूक्ष्म अभ्यास करून माहिती गोळा करण्यात यावी. आघाडी होवो ना होवो संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करावी. विभागवार जबाबदारी घेऊन निवडणुकीचे कामकाज करण्यात यावे. पक्ष अतिशय मजबुतीने उभा असून पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीला कोण-कोण  उपस्थित?

बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, महापालिका गटनेते गजानन शेलार, डॉ. शेफाली भुजबळ, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, शिवाजी सहाणे, नगरसेविका सुषमा पगारे, समिना मेमन, जगदीश पवार, सुफी जीन, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, ओबीसीसेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, धनंजय निकाळे, सरचिटणीस संजय खैरनार, प्रांतिक सदस्य महेश भामरे, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, जीवन रायते, मुजाहित शेख, बाळसाहेब गिते, माजी मनपा विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सुरेखा निमसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्याः

Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.