Rohit Pawar: मोठी बातमी! रोहित पवार यांची नागपूरात खलबतं, काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक, राष्ट्रवादीत घडतंय काय?

Rohit Pawar Secret Meeting within NCP : एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारविरोधातील मोर्चात पक्षातील वरिष्ठांनाच विश्वासात घेत नसल्यावरून आमदार रोहित पवार यांच्याविरोधात नाराजी असल्याची चर्चा असतानाच आता पक्षाच्या गोटातून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. त्यानुसार रोहित पवार यांनी मंगळवारी नागपूरातील काही पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक बोलावली होती.

Rohit Pawar: मोठी बातमी! रोहित पवार यांची नागपूरात खलबतं, काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक, राष्ट्रवादीत घडतंय काय?
रोहित पवार यांची नागपूरात खलबतं, काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक
| Updated on: Nov 25, 2026 | 8:20 AM

गजानन उमाटे, प्रतिनिधी टीव्ही9 मराठी: आमदार रोहित पवार यांच्या ‘एकला चलो रे’ धोरणाने राष्ट्रवादीत सध्या अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. पक्षाचे चिन्ह, नेत्यांचे फोटो न वापरताच रोहित पवार सरकारविरोधात भूमिका घेत असल्याने पक्ष नेतृत्वात तीव्र नाराजी असल्याचे वृत्त समोर येत आहे. सुप्रिया सुळे या घडामोडींमुळे नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचवेळी नागपूरमध्ये मोठी घडामोड घडली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनावर रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वीच नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. पवारांची राष्ट्रवादी भाजपशी जवळीक करत असल्याने पक्षात एक गट नाराज असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते रोहित पवार यांच्यावर विखारी टीका करत आहेत. ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा भाजपच्या गोटातून सुरू झाला आहे.

पदाधिकाऱ्यांसोबत रोहित पवार यांची गुप्त बैठक

Loading...

आमदार रोहीत पवार यांनी काल नागपूरातील काही पदाधिकाऱ्यांची नागपुरात गुप्त बैठक घेतली. ४ तारखेपासून निघणाऱ्या मोर्चावर उद्याच्या पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी कसं कनव्हिन्स करायचं? याबाबत बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत विदर्भातील काही महत्त्वाचे आणि मोजकेच नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. रोहीत पवार यांनी २२ तारखेला नागपूरात पत्रकार परिषद घेतल्यानंतर दोन दिवस नागपूर आणि विदर्भात मुक्कामी होते. रोहीत पवार यांनी आपला दौरा गुप्त ठेवला होता. काल ११ वाजता रोहीत पवार नागपूर येथून परतले.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us