AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येणार… 4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

सध्या देशावर आर्थिक संकट ओढावले असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाची झळ संपूर्ण जगाला पोहोचत आहे. अशातच एका बड्या नेत्याने पुढील चार दिवसांमध्ये मुंबईतही हाहा:कार माजेल असे म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येणार... 4 दिवस थांबा, मुंबईतही हाहा:कार माजेल; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Petrol DieselImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 25, 2026 | 12:38 PM
Share

सध्या देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. वाढती महागाई, संभाव्य आर्थिक संकट आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक सडकून टीका करताना दिसत आहेत. हे होणार हे १०० टक्के सत्य आहे, या देशावर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठे संकट येणार आहे हे आम्ही सांगत होतो. पण हे सरकार गंभीर नाही कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शेवटी धर्मावर जायचे आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाते नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.

पत्रकरांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “हे होणार हे १०० टक्के सत्य आहे, या देशावर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठे संकट येणार आहे हे आम्ही सांगत होतो. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी झळ लागू दिले नाही. अजून ४ दिवसांनी मुंबईत सुद्धा हाहाःकार माजेल. हे सरकार गंभीर नाही कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शेवटी धर्मावर जायचे आहे.”

देशात महागाईचा भडका उडालेला असताना सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही. काळाबाजार करणारे उघडपणे रांगेत उभे असताना सरकार त्यांना पकडत नाही. या सरकारला सामान्यांशी काहीही देणेघेणे नसून हे केवळ भांडवलदारांचे सरकार असल्याची जोरदार टीका करण्यात आली. तसेच, हे सरकार गंभीर नसून त्यांना माहिती आहे की आपले अपयश लपवण्यासाठी शेवटी त्यांना ‘हिंदू-मुस्लीम’ आणि धर्माच्याच मुद्द्यावर जायचे आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

‘केवळ इन्स्टाग्रामवरून राजकारण होत नसते’

अजित पवार गटाचे नेते जय पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगण्यात आले. केवळ इन्स्टाग्रामवरून राजकारण होत नसते आणि आपण ते पाहतही नाही, असे ते म्हणाले. तसेच, ज्यांना साहित्यातील ‘स’ देखील माहिती नाही, ते काय बोलणार, असा वैयक्तिक चिमटाही काढण्यात आला. वाढती महागाई आणि सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला सारून सरकार केवळ धार्मिक ध्रुवीकरण आणि स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा स्पष्ट संदेश या प्रतिक्रियांमधून देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळातील नेत्यांवर टीका

सध्याच्या मंत्रिमंडळातील नेत्यांवर घराणेशाहीचा थेट आरोप करत, मंत्रिमंडळातील सगळ्या लोकांनी आपल्या बायकांना कोणत्या ना कोणत्या पदावर बसवून दादागिरी सुरू करावी आणि सगळी पदे आपल्या बायका-मुलांना देऊन टाकावीत, असा उपरोधिक आणि संतापजनक टोला लगावण्यात आला. एका विशिष्ट प्रकरणाचा संदर्भ देत, ‘ते मुसलमान आहेत आणि ५० वर्षे ते त्या घरात राहिले आहेत,’ असे सांगत कारवाईतील दुजाभावाकडेही लक्ष वेधण्यात आले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा