AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची प्रकृती बिघडली, नेमका कसला त्रास? हेल्थ अपडेट काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना खोकला आणि कफचा त्रास होत असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवारांची प्रकृती बिघडली, नेमका कसला त्रास? हेल्थ अपडेट काय?
शरद पवारImage Credit source: ANI
| Updated on: Jan 26, 2025 | 7:56 AM
Share

Sharad Pawar health update : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. ते सध्या पुण्यात असून त्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे दौरे रद्द केले आहेत. आता शरद पवारांना नेमका कसला त्रास होतोय, डॉक्टरांची अपडेट काय, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवारांची प्रकृती ठीक होईपर्यंत ते मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांना थकवा जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडली

गेले वर्षभर महाराष्ट्रात निवडणुकांची धामधूम पाहायला मिळाली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका मे महिन्यात पार पडल्या. यानंतर विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या. या निवडणुकानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे तयारी करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही आगामी निवडणुकांची तयारी केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्ष बांधण्यासाठी शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र काल अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली.

शरद पवारांचा विदर्भ दौरा रद्द

शरद पवारांना गेल्या 8 ते 10 दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरु होता. तसेच गेले काही दिवस भाषण करतानाही त्यांना दम लागत होता. यानंतर काल शरद पवार यांची तब्येत बिघडली. यानंतर डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्ला आहे. सोमवार, मंगळवार दोन दिवस शरद पवार विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र तब्येत बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांनी काळजी करु नये

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतु कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...