Sunil Tatkare : ‘जे काही घडतय ते क्लेशकारक’, सुनील तटकरेंच स्पष्ट मत, कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर म्हणाले की…
Sunil Tatkare : "मला जी माहिती सूरज चव्हाण यांनी दिली त्यानुसार, निवेदन देऊन गेल्यानंतर उतरताना अशालघ्य शब्दात शिवीगाळ झाली. पत्रकार परिषद संपल्यानंतर मी खाली अनेकांना भेटलो. मी जराही विचलित झालो नाही. काही प्रसंग असे घडतात, जेव्हा राज्यकर्त्यांना जनतेच्या संतप्त भावनांचा स्वीकार करावा लागतो. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी अत्यंत संयमाने वागलो" असं सुनील तटकरे म्हणाले.

“माणिकराव कोकाटे यांच्या विषयावर मी एकदा बोललो आहे. अधिक बोलणं उचित वाटत नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या संदर्भातील पुढील भूमिका घेतील” असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. सुप्रिया सुळे आणि अन्य विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यावर सुनील तटकरे म्हणाले की, “विरोधकांनी काय मागणी करावी, हा त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे. त्या विषयावर मला विशेष काही बोलायचं नाही” तुमची माणिकराव कोकाटेंशी चर्चा झाली का? यावर ते म्हणाले की, ‘माझं माणिकरावांशी बोलणं होऊ शकलं नाही’
विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ शूट करण्यात आला त्याबद्दल पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारलं. ते म्हणाले की, “विधान भवनाच्या अखत्यारितील संबंधातील हा विषय आहे. हा भाग विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापतींच्या नियंत्रणाखाली येतो. जे शूटिंग झालं, ते उचित नव्हतं. व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय” “अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधिमंडळात जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे. विधानसभा अध्यक्षांनी याची सखोल चौकशी सुरु केली असेल. चौकशी केली पाहिजे” असं सुनील तटकरे म्हणाले.
‘अलीकडे जे काही घडतय ते क्लेशकारक’
उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळात मारामाऱ्या होतात, मंत्री रमी खेळतात, या प्रश्नावर सुद्धा सुनील तटकरे व्यक्त झाले. “महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून किंवा मुंबई राज्य असताना सुद्धा महाराष्ट्राच्या संस्कृत लोकशाहीची थोर परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरु केली. विरोधकांशी सौहार्दाचे असलेले संबंध, विधिमंडळाच्या कामकाजात अनेकदा प्रखर टीका झाली, ती शाब्दीक होती. अलीकडे जे काही घडतय ते क्लेशकारक आहे” असं सुनील तटकरे म्हणाले.
साधनसुचिता करणं आवश्यक
“मी 20 वर्ष विधानसभा, पाचवर्ष विधानपरिषद आणि 15 वर्ष या राज्याचा मंत्री म्हणून काम केलय, अलीकडे विधान भवनात घडलेल्या घटना क्लेशकारक आहेत. सुस्कृत महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या आहेत” असं सुनील तटकरे म्हणाले. या संदर्भात काही साधनसुचिता करणं आवश्यक आहे असं सुनील तटकरे म्हणाले.
‘मी काय आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित’
माणिकराव कोकाटे आज अजित पवारांना भेटणार आहेत का? यावर ते म्हणाले की, “आद कदाचित भेट होऊ शकते. दादा मुंबईत असतील, भेट झाल्यानंतर मला तपशील कळेल” छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना झालेल्या मारहाणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना आज सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं. “सुनील तटकरे म्हणून मी वेळेवेळी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या 41 वर्षाच्या सामाजिक जीवनात सामाजिक दृष्टया असलेली माझी भूमिका रायगडने नव्हे उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. मी काय आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. माझ्याविरुद्ध साधी एनसी नाही. अनेकवेळा पराकोटीच्या राजकीय संघर्षाची वेळ आली. पण या साऱ्या गोष्टींना मनात थारा दिला नाही”
‘पण मी संयमाने घेतलं’
“मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची सर्व यंत्रणा लावावी. आपल्याकडे सुद्धा व्हिडिओ आहे. माझी पत्रकार परिषद कितीवेळ झाली, निवेदन देत असताना काय शब्द बोलत होते, पत्ते टाकले पण मी संयमाने घेतलं. उभं राहून आभार मानले. मनोज जरांगे पाटलांना जे वाटतं ते त्यांनी जरुर बोलावं. मी काय आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे” असं सुनील तटकरे म्हणाले.
