AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार साहेबांनी उमेदवार द्यावा की नाही, हा…; सुनील तटकरे स्पष्टच बोलले, अर्थखात्याबाबतही मोठं वक्तव्य

Sunil Tatkare News: शरद पवार साहेबांनी कोणता उमेदवार द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही ताकदीवर लढू, असं सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

पवार साहेबांनी उमेदवार द्यावा की नाही, हा...; सुनील तटकरे स्पष्टच बोलले, अर्थखात्याबाबतही मोठं वक्तव्य
| Updated on: Oct 15, 2026 | 8:24 PM
Share

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील लढत चर्चेत आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. प्रतापसिंह पाटील, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या मैदानात आहेत. या लढतीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. पवार साहेबांनी कोणता उमेदवार द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या ताकदीवर निवडणूक लढू,” अशी भूमिका सुनिल तटकरेंनी स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीतही झाली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला प्रचंड यश मिळाल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. आता सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेच्या जागाही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील दोन्ही राष्ट्रवादींच्या उमेदवारांमधील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सुनील तटकरे आज पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पक्षाची भूमिका मांडतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम रकमेच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे तटकरे यांनी सांगितले. या विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार अर्थमंत्री असताना आपत्कालीन मदतीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली. सध्या अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, अशी पक्षाची मागणी असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे एका बाजूला पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अग्रीम रकमेचा प्रश्न आणि अर्थखात्याच्या मागणीवरून राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक