CBI ची अ‍ॅक्शन, लाखोंच्या लाच प्रकरणात NHAI चे सरव्यवस्थापक जाळ्यात, सापडले कोट्यवधी रुपये

cbi action nagpur | एनएचएचे सरव्यवस्थापक अरविंद काळे याला ‘सीबीआय’ने 20 लाखांची लाच घेताना केली अटक केल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका कंत्राटदाराकडून घेतलेल्या लाचेचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहे.

CBI ची अ‍ॅक्शन, लाखोंच्या लाच प्रकरणात NHAI चे सरव्यवस्थापक जाळ्यात, सापडले कोट्यवधी रुपये
cbi
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 8:34 AM

गजानन उमाटे, नागपूर | दि. 4 मार्च 2024 : केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) लाच प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने 20 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात NHAI (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) चे जीएम, डीजीएम यांना अटक केली आहे. तसेच खासगी कंपनीच्या 2 संचालकांसह 6 जण या प्रकरणात अडकले आहेत. सीबीआयने लाचेची रक्कम 1.1 कोटी जप्त केली आहे. एनएचएचे सरव्यवस्थापक अरविंद काळे याला ‘सीबीआय’ने 20 लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी सीबीआयने सापळा रचून काळे याला अटक केली आहे. लाचेच्या या रक्कमेची वाटणी 11 जणांमध्ये होणार होती. त्यामुळे सीबीआयने 11 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण

कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकारी काम करीत नसल्याच्या वास्तव सीबीआयच्या कारवाईनंतर समोर आले आहे. या कारवाईमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या स्वच्छ आणि पारदर्शक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका खासगी कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामाचे कंत्राट दिले होते. त्याच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी ही लाच अरविंद काळे यांनी घेतली.

अशी मागितली लाच

एका खासगी कंपनीने काम पूर्ण केल्यानंतर बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात एनएचए सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली. परंतु त्या भेटीच्या दोन महिन्यांनंतरही त्यांनी बिल मंजूर केली नाही. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने पुन्हा काळे यांची भेट घेतली. त्यावेळी अरविंद काळे यांनी बिल मंजुरीसाठी कार्यालयातील ११ कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर होणार नसल्याचे सांगितले. या प्रकरणी कंत्राटदाराने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केली.

हे सुद्धा वाचा

अरविंद काळे यांच्या घरी ४५ लाख रुपये

सीबीआयने काळे याच्या घराची झाडाझडती घेऊन ४५ लाख रुपये जप्त केले. तसेच मध्यप्रदेशमधील हरदा येथील उपमहाव्यवस्थापक ब्रजेश कुमार साहू, खासगी कंपनीचे दोन संचालक अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल, लाच देणारे दोन कर्मचारी सी. कृष्णा व छत्तर लोधी यांनाही ताब्यात घेतले आहे. या सर्वांकडून १.१० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ.
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...