VIDEO | निर्जला एकादशीचा उत्साह, कोरोनानंतर पहिल्यांदा टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली पंढरी

आज निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपूर नगरी टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात दुमदुमली आहे. (Nirjala Ekadashi 2021 Celebration at Pandharpur Vitthal Rukmini Temple)

VIDEO | निर्जला एकादशीचा उत्साह, कोरोनानंतर पहिल्यांदा टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली पंढरी
pandharpur
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jun 21, 2021 | 2:22 PM

पंढरपूर : विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात निर्जला एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपूर नगरी टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या गजरात दुमदुमली आहे. कोरोनानंतर जवळपास दीड वर्षाने पंढरी नगरी दुमदमली आहे. (Nirjala Ekadashi 2021 Celebration at Pandharpur Vitthal Rukmini Temple)

टाळ मृदुंगाच्या गजरात प्रदक्षिणा पूर्ण

आज निर्जला एकादशी… यानंतर येणारी एकादशी ही आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी असते. गेल्या वर्षभरापासून पंढरपुरात टाळकरी, फडकरी यांची नगरप्रदक्षिणा झाली नव्हती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पंढरपुरात फडकरी, टाळकरी यांनी प्रदक्षिणा मार्गावर 15 जणांच्या सोबत टाळ मृदुंगाच्या गजरात आपली प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. वारकऱ्यांची ही शिस्त पाहून शासनाने पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी राजाभाऊ चोपदार यानी केली आहे .

भक्तीमय वातावरण, भाविकांची गर्दी 

माघ महिन्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. अनेक दिवसांनंतर पंढरपुरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर बंद आहे. त्यामुळे अनेक भाविक हे नामदेव पायरी आणि मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.

मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांनी सुशोभीकरण

आज जेष्ठ शुद्ध निर्जला एकादशी आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुवासिक सुंदर अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी अशा मंदिरातील विविध भागाना या रंगीबेरंगी फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे. यात पिंक डिजे, कामिनी, गुलाब, झेंडू, गुलछडी, ऑरकेड अशा विविध रंगीबेरंगी फुलांचा समावेश आहे.

मंदिराला अशा विविध फुलांनी सजवण्यात आल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे सध्या हा सर्व परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळून निघाला आहे. तसेच यामुळे भाविकही सुखावले आहेत. पुणे येथील विठ्ठल भक्त संदिप पोकळे आणि सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे.  (Nirjala Ekadashi 2021 Celebration at Pandharpur Vitthal Rukmini Temple)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या : 

Nirjala Ekadashi | निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

PHOTO | विठोबाला पांढरं सोवळं, तर रखुमाईला नऊवारी, निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें