AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात पूर्वी सारखी शांतता नाही, संजय दत्तच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले …तोपर्यंत त्यांना कळणार नाही

इथे शांतता असायला हवी, परंतु मला आता भारतामध्ये पूर्वीसारखी शांतता वाटत नाही, असं विधान संजय दत्त यांनी केलं होतं, संजय दत्तच्या या विधानाला आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतात पूर्वी सारखी शांतता नाही, संजय दत्तच्या वक्तव्यावर नितेश राणेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले ...तोपर्यंत त्यांना कळणार नाही
नितेश राणेंचं संजय दत्तला उत्तर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 3:33 PM
Share

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्त याने एक मोठं विधान केलं होतं, या वक्तव्यामुळे आता चांगलाच वाद पेटल्याचं पहायला मिळत आहे. ‘इथे शांतता असायला हवी, परंतु मला आता भारतामध्ये पूर्वीसारखी शांतता दिसत नाही.  मी महादेवाचरणी प्रार्थना करतो की ते जुने दिवस पुन्हा यावेत’ असं विधान संजय दत्त याने केलं होतं, त्यावर आता भाजपचे मंत्री आणि नेते नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, संजय दत्तच्या या वक्तव्यावरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. हे कलाकार आमच्या देशामध्ये राहून मोठे होतात आणि त्यांचे नाव कमवतात, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे? 

हे कलाकार आमच्या देशामध्ये राहून मोठे होतात आणि त्यांचे नाव कमवतात, आज देशामध्ये सुरक्षिततेच वातावरण आहे, सगळेजण अतिशय गुण्या गोंविदाने राहतात. त्यांनी आजूबाजूच्या देशाची परिस्थिती जाऊन पहावी. पाकिस्तानमध्ये जाऊन पंधरा दिवस राहावं. आजूबाजूच्या दोन पाच देशांमध्ये जाऊन राहिल्यानंतर भारत किती सुरक्षित आहे हे त्यांना कळेल, असा निशाणा यावेळी नितेश राणे यांनी संजय दत्तवर साधला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी कुठलीही भविष्य़वाणी केली आणि ती खरी ठरली अशी एक तरी सांगा, आमचं सरकार स्थापन झाल्यापासून ते बोलत आहेत, हे सरकार दोन महिन्यात पडणार चार महिन्यात पडणार, पण आमचं सरकार अजून भक्कम होत आहे. आता त्यांचे घरचेच त्यांना गांभीर्याने घेत नाहीयेत, असा टोला यावेळी राणे यांनी राऊतांना लगावला आहे.

रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मूळ आंदोलन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, मात्र तिथे पत्रकारही सुरक्षित नसतील तर मीडियाने रोहित पवारांच्या बातम्या का दाखवाव्यात? याचाही विचार केला पाहिजे, असं राणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शहाजी बापू पाटलांचा यू-टर्न, विरोध मागे घेऊन प्रचारात सक्रिय
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
Video: ट्रिपल इंजिन सरकार विरोधात टोळीयुद्ध सुरू - हर्षवर्धन सपकाळ
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार