.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारची मोठी घोषणा! मच्छिमारांना मिळणार 50000 रुपयांची आर्थिक मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

monsoon fishing ban : राज्य सरकारने मच्छिमारांना मोठा दिलासा दिलाय. सरकार मच्छिमारांना 50000 रुपये देण्याच्या तयारीत आहे.

फडणवीस सरकारची मोठी घोषणा! मच्छिमारांना मिळणार 50000 रुपयांची आर्थिक मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
| Updated on: Jun 30, 2026 | 9:17 AM
Share

Maharashtra Monsoon : राज्य सरकारने मच्छिमारांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने समुद्रातील मासेमारीसाठी वार्षिक बंदी 25 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या बंदीमुळे आर्थिक नुकसान झेलणाऱ्या मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकार सध्या मच्छिमारांना 50000 रुपये देण्याचा विचार करत आहे. मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, यंदा पावसाला सुरू व्हायला उशीर झाल्यामुळे केंद्र सरकारने 1 जून ते 31 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीवर बंदी घातली आहे. परंतु आता राज्य सरकारने ही बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे’.

बंदी का वाढवली?

मंत्री राणे यांनी स्पष्ट केलं की, माशांच्या साठ्याचे संरक्षण करणे, समुद्रातील सजीवांना प्रजननासाठी वेळ देणे आणि मत्सव्यवसायासाठी दीर्घकालीन शाश्वतता निश्चित करणे असल्याचं म्हटलं आहे. या बंदीमागे समुद्रातील वारे, चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, खवळलेल्या समुद्रापासून मच्छिमारांचे संरक्षण करण्याचा देखील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच प्रस्ताव मंजूर होणार

नितेश राणे पुढे म्हणाले, ‘बंदी वाढवल्याने मच्छिमारांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार मच्छिमारांना 50000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव अर्थ विभागाला पाठवत आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल’. नितेश राणे यांनी पुढे म्हटलं की, सरकारने मत्स क्षेत्राला कृषी दर्जा दिलाय. त्यामुळे मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच अनुदान आणि सवलतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मत्सबीज उत्पादन वाढवण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आलीय. जिल्हा नियोजन समित्यांना त्यांच्या निधीपैकी 5 टक्के निधी मत्स विकासावर खर्च करण्याचा सल्ला देण्यात आलाय’.

मच्छिमारांसाठी मत्स्य संपदा योजनेंतर्गत 12,40 कोटी रुपयांची तरतूद

पहिल्यांदा अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान झेलणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स शेतकऱ्यांना 100 कोटी देण्यात आले. दुसरीकडे आता एआयवर आधारित एक सिस्टम तयार करून तलावांचे वाटप, मत्सपालन संस्थाची नोंदणी, इतर बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राज्यात मत्स्य संपदा योजनेंतर्गत 12,40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर