मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार सुरु आहे. सध्या विकेंड लॉकडाऊन सुरु असून शनिवार आणि रविवारी सर्व दुकानं बंद ठेवली जात आहेत. मात्र, दुकानं सुरु करण्याच्या व्यापाऱ्यांच्या निर्णयाला समर्थन देत आम्ही सर्व व्यापारी बांधवांसोबत असून महाराष्ट्र सरकारने व्यापाऱ्यांना कोणताही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे, असा निर्वाणीचा इशारा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलाय. ट्विटद्वारे राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे. (Nitesh Rane supports traders stand on opening of shops said government should not shop them)
“महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवारपासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार आहेत. आम्ही सर्व व्यापारी बांधवांबरोबर आहोत. महाराष्ट्र सरकारने कोणताही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे,” असे राणे म्हणाले आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने यापूर्वीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सोमवार पासून सर्व दुकाने खुली करण्यात येणार असून..
सर्व व्यापारी बांधवान बरोबर आम्ही आहोत!! महाराष्ट्र सरकार नी कुठला ही त्रास दिला तर संघर्ष अटळ आहे!!
— nitesh rane (@NiteshNRane) April 11, 2021
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यात सर्व जिल्ह्यांत निर्बंध घालण्यात आले आहेत. मागील लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे आधीच नुकसान झालेले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आणखी नुकसान करु नये, अशी भूमिका राज्यात अनेक व्यापारी संघटनांची आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांनी निर्बंधांना विरोध केला आहे. तसेच, आम्हाला दुकानं सुरु ठेवण्यास निर्बंध घालू नयेत. आम्ही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सर्व ती काळजी घेऊ असे आश्वासन अनेक संघटनांकडून दिले जात आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त वाढत असल्यामुळे राज्य सरकार पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करत आहे. लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सध्या जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू न करता कठोर निर्बंध लागू करावेत,’ अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा नितेश राणे यांनी केला असला तरी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने संपूर्ण लॉकडाऊनबाबत निर्णय होईपर्यंत दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन केले आहे. “उद्धव ठाकरे यांनी आज (11 मार्च) टास्क फोर्सच्या मिटिंगमध्ये सर्व बाबींचा उहोपोह केला. राज्यात कोव्हिड 19 महामारीच्या वाढत्या प्रसारास प्रतिबंध करण्याबाबत संपूर्ण Lockdown बाबत निर्णय घेणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा निर्णय येईपर्यंत बिगर अत्यावश्यक वस्तूचे (Non Essential) दुकाने उघडू नयेत. तसेच Disaster Management Act 2005 चे उल्लंघन करुन कठोर कारवाईचा धोका पत्करू नये,” असा सोलापूर कॉमर्स चेम्बरने म्हटलं आहे.
इतर बातम्या :
LIVE | रत्नागिरीत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेर, घरावर आणि लग्न मांडवावर कोसळले झाड
(Nitesh Rane supports traders stand on opening of shops said government should not shop them)