AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Nitin Gadkari on Corona).

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी
| Updated on: Apr 24, 2020 | 7:24 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत (Nitin Gadkari on Corona). महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत, हा राजकारणाचा वेळ नाही, एकमेकाला दोष देण्याची वेळ नाही. एकमेकांना मदत करण्याची ही वेळ आहे. संकटावर मात करायची आहे. भारत सरकारचं, आम्हा सर्वांचं त्यांना सहकार्य आहे”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Nitin Gadkari on Corona).

“पीपीईबद्दल मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवर सांगितलं. ते म्हणाले मी कलेक्टरशी बोलतो. त्यानंतर मग मी स्वत: नागपूरच्या कलेक्टरना सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, जरुर ती व्यवस्था करुन द्या. जर मुख्यमंत्र्यांनी मला जरी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, त्यांना लाख-दीड लाख पीपीई किट नागपूरहून मुंबईला पाठवायला तयार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबाबत समन्वय नीट झाला, तर आपल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतील. मात्र त्यामध्ये एकदिशा असावी”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“आम्ही नागपूरला एकाकडून सीएसआरमधून 1 कोटी रुपये घेतले. त्यातून आम्ही 15 हजार पीपीई किट घेतल्या आणि अनेक रुग्णालयांना त्या मोफत दिल्या. आमच्याकडे एमईसीएमचा रेडिमेड गारमेंट झोन आहे. तिथे 1200 महिला काम करतात. महाराष्ट्राला हव्या आहेत तेवढ्या पीपीई किट्स केवळ नागपूरमधून मिळू शकतात. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याची कल्पना दिली. इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“पीपीई किट्स किंमत 1200 रुपये होती. त्या 650 रुपयांमध्ये मिळतात. त्याला मंजूरी मिळाली आहे. त्याबाबत सर्व अहवाल आहेत. पाहिजे असेल तर मुंबईत कमीतकमी 25 हजार प्रतिदिन प्रमाणे ताबडतोब 2 ते 3 लाख किट पाठवता येतील. पण मला वाटतं यात जी निर्णय घेण्याची जी पद्धत आहे त्यात सर्वजण एकमेकांना विचारतात. खरंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गरज असेल तर याबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावेत. तसेच महाराष्ट्रात अशाप्रकारे कोठे कोठे उपलब्ध होऊ शकेल? याबाबतही त्यांनी विचार करावा. विशेषतः आपल्याकडे सॅनिटायझर आहे. आपण अनेक साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी परवानगी दिली”, असं गडकरी यांनी सांगितलं.

“मी स्वतः आमच्या कारखान्यातून 1 लाख सॅनिटायझर बाटल्या मोफत वाटल्या. जे आधी 1200 रुपये लिटरला विकलं जायचं ते आता 400 रुपये लिटरने विकलं जातं. महाराष्ट्र सरकारने याची किंमत 500 रुपये ठेवली आहे. असं करुन आम्ही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती, नगरपालिका यांना वाटप केले. त्यामुळे आता सॅनिटायझर आणि पीपीई किटची कमतरता नाही. उलट मला सॅनिटायझरवाल्याने त्यांच्याकडे अधिकचं उत्पादन असल्याचं सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.