
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. या घोषणेनुसार, नाशिकसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मतदान 15 जानेवारी 2026 रोजी पार पडेल आणि मतमोजणी होऊन 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये कोणता भाग आहे? लोकसंख्या किती आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक 11 हा प्रामुख्याने सातपूर या औद्योगिक विभागाचा भाग आहे. या प्रभागाचा विस्तार सातपूर कॉलनी, शिवाजी नगर, श्रमिक नगर आणि ध्रुव नगर या परिसरापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार आणि 2017 च्या प्रभाग रचनेनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 38,000 ते 42000 च्या दरम्यान आहे. हा प्रभाग प्रामुख्याने ‘कामगार वस्ती’ म्हणून ओळखला जातो, कारण येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर सातपूर औद्योगिक वसाहतीतील (MIDC) कारखान्यांवर अवलंबून आहे. या प्रभागातून रिपाईच्या दिक्षा लोंढे, मनसेचे योगेश शेवरे, सलीम शेख आणि शिवसेनेच्या सीमा निगळ यांनी विजय मिळवला होता.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 12 मध्ये अशोक नगर, सातपूर गावठाण, कार्बन नाका आणि सातपूर कॉलनीचा उर्वरित भाग येतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 40000 ते 45000 च्या आसपास आहे. हा परिसर नाशिकमधील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक आहे. या प्रभागाचा विस्तार त्र्यंबक रोडला लागून असलेल्या वसाहतींपासून ते अंबड लिंक रोडच्या काही भागापर्यंत पसरलेला आहे. या प्रभागाचा विकास प्रामुख्याने रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्यांभोवती फिरत असतो. 2017 साली या प्रभागातून भाजपच्या प्रियंका घाटे आणि शिवाजी गांगुर्ड तसेत काँग्रेसच्या समीर काबळे आणि हेमलता पाटील यांनी विजय मिळवला होता.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE