उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार, खासदार दिसणार नाही – अनिल पाटील

आम्ही भाजपमधून येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देवू' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा एकही आमदार, खासदार दिसणार नाही - अनिल पाटील
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 12:07 PM

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे खडसेंच्या येण्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत आहेत. ‘एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला बळ मिळेल. आम्ही भाजपमधून येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देवू’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. (No BJP MLA MP will be seen in North Maharashtra said by MLA Anil Patil)

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत ‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’ असं विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी वीस वर्ष भाजपामध्ये घालवले. ते दिवस वाया गेले. पण आता खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर रक्षा खडसेदेखील येत्या काळात विचार करतील’ असं अनिल पाटील म्हणाले आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपच्या गडाला सुरूंग जळगाव जिल्हा आणि एकनाथ खडसे हे समीकरणच आहे. सत्ता कुणाचीही असो, जिल्ह्यात गेल्या किमान 25 वर्षापासून खडसेंचे वर्चस्व आहे. एकनाथ खडसे हे 6 वेळा भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपला मोठी झळ बसेल आणि राष्ट्रवादीला मात्र बळ मिळणार आहे. इतकंच नाही तर खडसेंनी जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा खालसा करून गेल्या 30 वर्षांपासून त्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकावला आहे. (No BJP MLA MP will be seen in North Maharashtra said by MLA Anil Patil)

याशिवाय जिल्ह्यातील फैजपूर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर आणि वरणगाव नगरपालिका व नगर परिषदवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. दूध फेडरेशनचे अध्यक्ष पद हे खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी खडसेंची मुलगी रोहिणी खडसे आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची पकड घट्ट होऊ शकते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक जागा कमी आहे. त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. जिल्ह्यात 32 टक्के लेवा पाटील समाज असून समाजाचं मोठे पाठबळ राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे.

पीकअपच्या भीषण अपघातात दुचाकीस्वारांनी दिला मृत्यूला चकवा, थरकाप उडवणारं CCTV फूटेज

रक्षा खडसे भाजपमध्येच? एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

(No BJP MLA MP will be seen in North Maharashtra said by MLA Anil Patil)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.