Maharashtra Corona Update : घाबरण्याचं कारण नाही, राज्यातल्या कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आश्वासक सूर, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट

नव्या कोविड केसेसमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आम्ही 12-15 आणि 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करत आहोत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

Maharashtra Corona Update : घाबरण्याचं कारण नाही, राज्यातल्या कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आश्वासक सूर, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट
राज्यातील कोविड परिस्थितीची माहिती देताना राजेश टोपेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 2:12 PM

मुंबई : राज्यातील कोविड 19 (Covid) परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला आहे. काळजी करण्याची गरज नाही. कारण नव्या कोविड केसेसमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आम्ही 12-15 आणि 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करत आहोत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना रुग्णवाढीने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. त्यात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मास्कसक्ती (Mask) पुन्हा होण्यावर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता, काळजी करण्याचे काण नसल्याचा टोपे यांचा आश्वासक सूर दिसून आला.

राज्यातील स्थिती काय?

राज्यातील आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मंगळवारी (19 एप्रिल) 127 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 7,876,041 इतकी झाली आहे. तीन दिवसांनंतर राज्यात कोरोनामुळे मंगळवारी तीन रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही 1,47,830 इतकी झाली आहे. सोमवारी (18 एप्रिल) रोजी राज्यात 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.

राजधानीतही रुग्णांत वाढ

राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग काळजी करायला लावणारा आहे. मंगळवारी 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत. तर सोमवारी 501 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत 26 टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. तसेच संसर्ग वाढण्याचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा :

Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी 2 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर! तर 40 रुग्णांचा 24 तासांत मृत्यू

ब्रेकिंग! पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीनं डोकं वर काढलं, गेल्या 24 तासांतली आकडेवारी बघाच

CNG rates hike : पुणेकरांना पंधरा दिवसांत दुसरा धक्का, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.