Sanjay Raut : मग देव घाबरतो कोणाला? नॉर्वे महिला पत्रकाराच्या प्रश्नावरुन राऊत यांचा मोदींना सवाल

महाराष्ट्र फाईल्स चित्रपट येतोय. त्यावर राऊत यांनी "मोदी फाईल्स, अमित शाह फाईल्स कधी येणार? बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीवर बंगाल फाईल्स चित्रपट आला पाहिजे" असं म्हणाले.

Sanjay Raut : मग देव घाबरतो कोणाला? नॉर्वे महिला पत्रकाराच्या प्रश्नावरुन राऊत यांचा मोदींना सवाल
Sanjay Raut-Narendra Modi (1)
| Updated on: May 20, 2026 | 12:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी यांना नॉर्वेमध्ये महिला पत्रकार हेली लेंग यांनी प्रेस फ्रीडम, मानवाधिकार या मुद्यांवर प्रश्न विचारला. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. आज खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेमध्ये याच मुद्यावरुन नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. “हिंदुस्थान लोकशाहीप्रधान देश आहे. सर्वात मोठ्या लोकाशाही देशाचा पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाही, जेव्हा समोर येतो. तिथले लोक प्रश्न विचारतात त्यावेळी पळून जाणं हा भारतीय लोकशाहीसाठी धोका आहे. आपल्या पंतप्रधानांनी 12 वर्षात अजून एकही पत्रकार परिषद घेतली नाही, कोणाला घाबरता?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“तुम्ही सभेत, संसदेत भाषण करता. तुम्ही स्वत:ला सक्षम नेता समजता. तुम्ही देशाचं नेतृत्व करताय. तुमचे लोक तुम्हाला देवाचा अवतार मानतात. मग देव घाबरतो कोणाला?” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “नॉर्वेच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला, त्याला उत्तर देण्यात तुमचं आणि देशाचं शौर्य होतं. पण तुम्ही देशाचं नाव मातीत मिळवलं. मग परदेशात का जाता? कुठल्या पत्रकाराने प्रश्न विचारला, त्याला माहिती हवी असेल, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे” असं राऊत म्हणाले.

फक्त फिरायला जाता, फोटो काढता

“इंदिरा गांधी 42 वर्षांपूर्वी नॉर्वेला जाऊन तिथल्या पंतप्रधानांना भेटल्या होत्या. पत्रकार परिषद घेतली. पंडित नेहरू अमेरिकेत जाऊन पत्रकारांशी बोलायचे. पण 12 वर्षात मोदींनी देशात ना विदेशात पत्रकार परिषद घेतली. फक्त फिरायला जातात. फोटो काढतात. तिथल्या नेत्यांसोबत गळाभेट घेतात. तिथून निघून येतात. एक तरी पत्रकार परिषद घ्या. दिल्लीत, नेदरलँड, नॉ़र्वे कुठेही घ्या. पंतप्रधानपद सोडण्यापूर्वी पत्रकारांशी मोकळेपणाने बोला” असं संजय राऊत म्हणाले. “या विषयाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. लोकशाही देशाचे पंतप्रधान नॉर्वेच्या पत्रकार हेली लेंग यांच्या प्रश्नाला घाबरुन निघून गेले” असं राऊत म्हणाले.

जनतेला आपली लढाई लढावी लागेल

आज केमिस्ट असोशिएशनचा संप आहे, उद्या ट्रान्सपोर्टरचा त्यावर राऊत बोलले की, “ट्रान्सपोर्ट्स, केमिस्ट अनेकांना संप करायचा आहे. पंतप्रधान बोलतील का? राज्याचे मुख्यमंत्री कोणी त्यावर उत्तर देणार नाही. जनतेला आपली लढाई लढावी लागेल”

शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर काय बोलले?

एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत. ते चार्टड फ्लाइटने जातात. पण यावेळी नॉर्मल विमानाने गेले. त्यावर पत्रकारांनी राऊत यांना विचारलं. “त्यांनी सगळं विमान बुक करुन नॉर्मल फ्लाईटला चार्टड विमान बनवलं असेल. त्या विमानाची कॅपिसिटी 200 ची असेल तर सर्व सीट हे बुक करु शकतात” असं राऊत म्हणाले.

 

 

 

Follow Us