AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रत्नागिरी विमानतळावरूनही टेकऑफ; विमानतळाच्या विकासासाठी तात्काळ निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईः रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांसाठी (found facility) आवश्यक निधी (fund) उपलब्ध करून दिला जाणार असून आता चिपी पाठोपाठ रत्नागिरी विमातळावरूनही (Airport) प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याची माहित उद्धव ठाकरे यांनी दिली. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी त्यांनी संबंधित विभागाना त्याचे निर्देश […]

आता रत्नागिरी विमानतळावरूनही टेकऑफ; विमानतळाच्या विकासासाठी तात्काळ निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
ratnagiri airport
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 3:52 PM
Share

मुंबईः रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांसाठी (found facility) आवश्यक निधी (fund) उपलब्ध करून दिला जाणार असून आता चिपी पाठोपाठ रत्नागिरी विमातळावरूनही (Airport) प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याची माहित उद्धव ठाकरे यांनी दिली. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यावेळी त्यांनी संबंधित विभागाना त्याचे निर्देश दिले. मागील आठवड्यातही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विमानतळाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी धावपट्टी आणखी वाढवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. या विमानतळाला संरक्षणाच्यादृष्टीने महत्व प्राप्त होणार असून त्यासाठी विमानतळाचे काम काटेकोरपणे केले जाणार आहे.

विमानतळासाठी जोरदारपणे काम सुरू

रत्नागिरी विमानतळाचे काम जोरदारपणे सुरू आहे, मात्र या विमानतळावरुन लवकर प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे, त्यासाठी लागणारा निधी लवकर उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

धावपट्टी लांबी वाढविणार

रत्नागिरी विमानतळ उद्योग वाढीसाठी महत्वाचे असून त्यासाठी रत्नागिरी विमानतळीची धावपट्टीची लांबी वाढविण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले आहे. होणाऱ्या विमानतळाजवळ कोस्टगार्डची इमारत असल्याने त्यांना पर्यायी इमारतीमध्ये जागा देण्यासाठी कोणती जागा उपलब्ध करून दिली जावी यासाठीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मागील आठवड्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनीही रत्नागिरी विमानतळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनीही देशाच्या संरक्षणासाठी रत्नागिरी विमानतळाला भविष्यात महत्व येणार असून हे विमानतळ लवकरात लवकर प्रवासी वाहतूकीसाठी सज्ज होणार आहे.

संबंधित बातम्या

Nagpur | ताडोबा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; विजय वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक

औरंगाबादसारख्या शहरात आठ दिवसांआड पाणी खेदजनक, राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची खंत!

Hindustani bhau : रुको जरा सबर करो, हिंदुस्तानी भाऊचा कोठडी मुक्काम वाढला, पोलिसांच्या हाती काय माहिती?

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.