AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींकडून आता आरपारची घोषणा, तीन बस भरून खासदार जंतरमंतरच्या दिशेनं, राजधानीत वातावरण तापलं

मोठी बातमी समोर येत आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून आता दिल्लीमधील जंतरमतंरवर आंदोलन करण्यात येणार आहे.

राहुल गांधींकडून आता आरपारची घोषणा, तीन बस भरून खासदार जंतरमंतरच्या दिशेनं, राजधानीत वातावरण तापलं
दिल्लीमध्ये विरोधी पक्षाचं आंदोलन Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 07, 2026 | 4:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून आता दिल्लीमधील जंतरमतंरवर आंदोलन करण्यात येणार आहे. तीन बस भरून खासदार जंतरमंतरच्या दिशेनं निघाले आहेत. मात्र या बस आता मध्येच अडवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बस अडवण्यात आल्यामुळे विरोधी खासदारांकडून आता भाजप विरोधात घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे.  त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसह इतर विरोधी पक्ष हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यासाठी आता जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान मंगळवारी देखील विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि खासदार सहभागी झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आता जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे.

दिल्ली पोलिसांनी गाड्या अडवल्या 

दरम्यान विरोधी पक्षाचे खासदार बसमध्ये बसून आंदोलनासाठी जंतरमंतरच्या दिशेनं निघाले आहेत. परंतु आता या बस पोलिसांनी मध्येच अडवल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बस अडवल्यामुळे खासदार आक्रमक झाले असून, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. खासदारांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

सध्या देशभरात एसआयआर प्रक्रिया सुरू आहे. यावर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी होत असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यासाठीच गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व विरोधी पक्षातील खासदार एकवटले आहेत.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?