Maharashtra Corona update : राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या जवळ, दिवभरात 9 हजार 170 नवे रुग्ण

राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजाराच्या जवळ पोहोचला आहे, आज दिवभरात 9 हजार 170 रुग्ण नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर एकट्य़ा मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढे गेला आहे, राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे.

Maharashtra Corona update : राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या जवळ, दिवभरात 9 हजार 170 नवे रुग्ण
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 8:20 PM

राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजाराच्या जवळ पोहोचला आहे, आज दिवभरात 9 हजार 170 रुग्ण नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर एकट्य़ा मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढे गेला आहे, राज्यात आज 7 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत चालल्याने पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाकडून निर्बंध आणखी कडक करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडा सर्वात जास्त असल्याने मुंबईत नियम आणखी कठोर केले जाण्याबाबत विचार सुरू आहे.

राज्यातील रुग्णांपैकी एकट्या मुंबईत निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण

आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी 9 हजारांच्या पुढे पोहोचली असतली तरी त्यात  मुंबईतील कोरना रुग्णांची आकडेवारी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच 6 हजारांच्या पुढे आहे. मुंबई वगळता राज्यातली आकडेवारी ही 3 हजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची जास्त चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग वाढतोय. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत. संख्या वाढू नये, संसर्ग वाढू नये, यासाठीचे उपाय करणं हे पहिलं प्राधान्य आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. मुंबई-पुण्यात संख्या वाढतेय, त्यामुळे या शहरांमध्ये अधिक कडक निर्बंध जारी होणार का, असा प्रश्ना टोपे यांनी उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर 10-11च्या दरम्यान आहे. मुंबई, ठाणे, पुणे या भागात जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे. पॉझिटिव्हिटी रेट, बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून सरकार योग्य तो निर्णय घेईल असं राजेश टोपे यांनी म्हटलंय.

लॉकडाऊनबाबत टोपे काय म्हणाले?

लॉकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. लॉकडाऊनची झळ प्रत्येकाला बसली आहे. जान है तो जहान है. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, यालाच आमचं पहिलं प्राधान्य असणार आहे. कठोर निर्णय घ्यावे लागले, तर घेऊच. पण एक नक्की आहे, निर्बंध पहिलं पाऊल असतं. लोकांनी ते पाळले, तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास टोपे यांनी बोलताना व्यक्त केलाय.आज एक टप्पा आपण ठरवून दिलेला आहे. मर्यादा घातलेल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहे. त्याचा परिणाम एक दोन दिवसात दिसेल. यावरुन नियंत्रणात आलं, तर ठीक, नाहीतर अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंदेखील पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

UP Crime: एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीची हत्या; दोन मित्रांच्या मदतीने प्रियकराने रचला कट

Video | मित्राला जोरात झोका देणं जीवावर बेतणारच होतं, पण दरीत कोसळण्याआधी…

अर्थचक्रावर ‘ओमिक्रॉन’चं मळभ: सोनं गाठणार 55 हजारांचा टप्पा, बाजाराचे संकेत

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.