AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांना प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का लागते? थेट सवाल, ओबीसी नेत्याने..

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा समाजाने अनेक जिल्हांमध्ये बंदची हाक दिली आहे. काल प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला पोहोचले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. ते भावनिक साद घालताना दिसले होते.

मनोज जरांगे यांना प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का लागते? थेट सवाल, ओबीसी नेत्याने..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 03, 2026 | 11:43 AM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. राज्यात राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी भाजपा नेते प्रसाद लाड अंतरावली सराटीत गेले होते. मात्र, जरांगे यांनी पाणी पिण्यास होकार दिला पण उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज राज्यातील अनेक जिल्हांमध्ये बंद पुकारण्यात आला. कडकडीत बंद पाळला जातोय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा बांधवांकडून आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके परवानगी नसतानाही मुंबईकडे निघाले आहेत.

हाके यांच्या मोर्चाला परवानगी नसतानाही ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. हाके यांना जरांगेंच्या आंदोलनाबद्दल विचारले असताना त्यांनी म्हटले की, त्यांचे ते उपोषण आणि उपोषणाला लाल गोधडीच का लागते? यामागचे उपोषण आणि उपोषणामागचे उपोषण… जे डिफेंडर गाडीमधून फिरू शकतो, असं म्हणतो.. तो उपोषण काय प्रामाणिकपणे करणार…

प्रश्नच नाही.. शासनाकडे रिपोर्ट आहेत, ब्लड रिपोर्ट आहेत. अधिकाऱ्यांचा दावा आहे की, आरोग्य अधिकाऱ्यांचा. उपोषण करणाऱ्या माणसाच्या ब्ल़ड टेस्ट, युरीन टेस्ट कशा येतात… त्यातून सर्व दिसते ना ग्लुकोस वगैरे. त्यामुळे एकदा नक्कीच चाैकशी झाली पाहिजे. त्या लाल गोधडीत नक्की काय दडलंय का? मनोज जरांगे पाटील उपोषणाला बदनाम करत आहेत.

मनोज जरांगे पाटील हे पहिल्या दिवसापासून लाल गोधडी घेऊन उपोषण करतात. पहिल्या दिवसापासून त्यांची तीच गोधडी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातून लोकांना अगोदरच आवाहन केले की, हळूहळू करून सर्वांनी मुंबईकडे जावे. झेंडे न लावता जा म्हणजे पोलिसांना संशय येणार नाही. कोणीही आझाद मैदानाकडे जाऊ नका. मी पण 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत येतो, असे त्यांनी म्हटले.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट