AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर… मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?

CJP-Congress-Modi Government: कॉक्रोच जनता पार्टीसमोर सरकारने सरेंडर केले आहे. आता राम मंदिरातील दानपेटीच्या सुरक्षेसाठी सुद्धा सरकारला कोणी मिळत नसल्याचा आरोप एका बड्या नेत्याने केला आहे. 2029 पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्याने मोठा संकेत दिला आहे.

झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर... मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?
अभिजीत दिपके, राहुल गांधी, नरेंद्र मोदीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 11:41 AM
Share

Cockroach Janata Party: नीट-युजी पेपर लीक प्रकरणात जंतर-मंतर मैदानात मोठे आंदोलन झाले आणि तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. पण कॉक्रोच जनता पार्टी केवळ इथंपर्यंतच थांबली नाही. त्यांनी त्यांच्या इतर मागण्याही सरकारकडून मान्य करून घेतल्या. अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या एका आंदोलन, संस्थेसमोर सीजेपीसमोर मोदी सरकार सरेंडर झाले. सुप्रीम कोर्टातही सरकारने आंदोलकांवर गुन्हे मागे घेतल्याचे स्पष्ट केले. अवघ्या काही दिवसांच्या संघटनेसमोर सरकार जर गुडघे टेकवत असेल तर मग विरोधक काय करत आहेत? असा सवाल करत बिहारमधील मोठे नेते शिवानंद तिवारी यांनी 2029 मधील निवडणुकीपूर्वी देशाच्या मूडविषयी मोठे संकेत दिले आहेत.

क्रॉकोच जनता पार्टीच्या तीन मागण्या मान्य

नीट परीक्षेतील गडबड आणि पेपर लीक प्रकरणानंतर देशात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने एक एक कोटी रुपयांची भरपाई देण्यास मंजूरी दिली. तत्कालीन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्या गेला. आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. त्यांच्याविरोधात कुठलाही खटला चालवल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. म्हणजे सरकार या अवघ्या तीन ते चार महिन्याच्या संघटनेसमोर झुकले. मग आता प्रश्न उरतो की, मोठं-मोठे राजकीय पक्ष करतायेत तरी काय? ते कोणते महल, बंगले बांधत आहेत? कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले काही उमेद तरुण एकत्र आले. तीन ते चार महिन्यात त्यांनी सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. राजकीय पक्षांच्या भूमिकेवर तिवारी यांनी मोठे प्रश्नचिन्ह तर उपस्थित केलेच. पण दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी देशात काय घडामोडी घडत आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल याविषयीचे मोठे संकेत त्यांनी दिले.

काँग्रेसला पर्याय की भाजपला आव्हान?

तिवारी यांचे वक्तव्य सध्याच्या बदलत्या राजकारणावर महत्त्वाचे आहे. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. मोदी सरकार मोठं मोठ्या राजकीय पक्षाला जुमानले नाही. पण एका दीड महिन्याच्या पक्षासमोर हे सरकार कसे झुकले हा त्यामागील त्यांचा संदर्भ आहे. तरुणाईची शक्ती आणि नाडी सीजेपीने ओळखली. ती ओळखण्यात इतर पक्ष कमी पडले आहेत का? की या पक्षामागे इतर कुणाचा हात आहे, हे तिवारी यांनी स्पष्ट केले नाही. पण त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत दोन वर्षानंतरच्या राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आताच तयार होत असल्याचे मोठे संकेत मात्र दिले आहेत.

Follow Us
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव