AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करदात्यांच्या पैशांमधून अधिकाऱ्यांच्या सहली, आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांवर जोरदार हल्लाबोल

मोठी बातमी समोर येत  आहे. उद्योग मंत्रालयातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

करदात्यांच्या पैशांमधून अधिकाऱ्यांच्या सहली, आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांवर जोरदार हल्लाबोल
Aaditya ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 7:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत  आहे. उद्योग मंत्रालयातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी आता उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळासारख्या संकटाशी झुंज देत आहे. मात्र दुसरीकडे उद्योग मंत्र्यांच्या विभागातील अधिकारी लंडन दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यासाठी पाच कोटीहून अधिक खर्च आला आहे. करदात्यांच्या पैशांमधून ही सहल आहे, असा जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर आता आरोप -प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

उद्योग मंत्रालयातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत, यावरून आदित्य ठाकरे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  एकीकडे महाराष्ट्र दुष्काळा सारख्या संकटाशी झुंद देत आआहे.  तर दुसरीकडे उद्योगमंत्र्यांच्या विभागातील अधिकारी एका परिषदेसाठी लंडनला गेले आहेत. या लंडन दौऱ्यासाठी पाच कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला अशी माहिती समोर येत आहे. हे सगळे पैसे करदात्यांचे आहेत. करदात्यांचे कोट्यवधी रुपये या दौऱ्यावर खर्च झाले आहेत.  उद्योग मंत्र्यांनी ऐनवेळी या शिष्टमंडळासोबत लंडनला जाणं टाळलं, मात्र तरी उर्वरित गटाला तिथे जाण्याची काय गरज होती? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

याच ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, दुष्काळाचा फटका उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे. अशा स्थितीमध्ये करदात्यांच्या पैशांवर लंडन सहलीचा आनंद घेण्याऐवजी या अधिकाऱ्यांनी  ‘सुपर एल निनो’च्या काळात, वीज आणि पाणी यांचं व्यवस्थापन करण्यासाठी  विविध जिल्ह्यांचे दौरे करण्याची गरज नव्हती का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केला आहे. दरम्यान आता आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना उदय सामंत नेमकं काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...