AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन टायगर फसलं? ओमराजेंचा थेट एकनाथ शिंदेंना फोन? अमित शाहा सोबत असतानाच…

आज पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. मात्र दुसरीकडे या सर्व पार्श्वभूमीवर राजकारणात आता वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

ऑपरेशन टायगर फसलं? ओमराजेंचा थेट एकनाथ शिंदेंना फोन? अमित शाहा सोबत असतानाच...
Omraje NimbalkarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 4:05 PM
Share

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव होतं. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु आता ओमराजे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

शनिवारी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे. अजून पक्षप्रवेशाचं ठरलेलं नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि मगच पुढचा निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. एवढंच नाही तर या निकालाचा आणि पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला, त्यावेळी एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर अमित शाहा यांच्या बाजुलाच होते, फोन येताच त्यांनी ताडकन बाजूला जात तो फोन रिसिव्ह केल्याचं पहायला मिळालं. हा फोन ओमराजे निंबाळकर यांचाच असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ओमराजे यांच्या तळ्यात -मळ्यात भूमिकेमुळे आता शिवसेना शिंदे गटात अस्वस्था निर्माण झाली आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...