AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच, थेट सोशल मीडियावर..

खासदार ओमराजे निंबाळकर आज धाराशिवमध्ये आहेत. आज उद्धव ठाकरे देखील धाराशिव दाैऱ्यावर आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे धाराशिव दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, पण अजूनही मन तिथेच, थेट सोशल मीडियावर..
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray
| Updated on: Jun 28, 2026 | 11:39 AM
Share

देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना होणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दाैरा आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये दाखल होत आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान ओमराजे निंबाळकर देखील धाराशिवमध्येच असणार आहेत. बालाजी तिरुपती आणि शनिशिंगणापूर येथे देवदर्शन करून खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. मतदारसंघात परतल्यानंतर ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून पुढील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांच्या हालचालींमुळे आज धाराशिवच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

6 खासदारांसोबतच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी बंडखोरी केली. ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगितले जायचे. मात्र, अचानक त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. पण ओमराजे निंबाळकर अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फॉलोअर्समध्ये आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यभर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया हालचालींचीही चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याची चर्चा आहे. यादरम्यानच ओमराजे निंबाळकर मात्र, अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांना फॉलो करत असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्यातरी सोशल मीडियावरील हे फॉलो नाते कायम असल्याचे दिसत आहे. दरम्यान आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लोकसभा मतदारसंघात धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांच्यावर नक्की काय टीका केली जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका निंबाळकर यांच्यावर केली आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!