AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या खासदारासोबत एकाच गाडीतून प्रवास, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण

Operation Tiger : गेल्या काही काळापासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशातच आज ठाकरे गटाच्या एका खासदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या खासदारासोबत एकाच गाडीतून प्रवास,  ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण
Shinde and Sanjay Dina PatilImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 05, 2026 | 5:56 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचे पहायला मिळाले आहे. खासकरून लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बऱ्याच नेत्यांनी महायुतीतील पक्षांची वाट धरली होती. आता गेल्या काही काळापासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशातच आज ठाकरे गटाच्या एका खासदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता, त्यांच्यावर मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. एकनाथ शिंदे निघाले तेव्हा त्यांच्या गाडीत संजय दिना पाटील बसले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा

एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील हे जुने सहकारी आहेत, एक जुने सहकारी मित्र म्हणून रुग्णालयात तब्येतीची विचारपूस करायला जाण्यापर्यंत ठीक होतं. मात्र संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदेंनी जिंकले मन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडत असताना एका दिव्यांग महिलेने आपल्या मुलाच्या कामाच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडे मदत मागितली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली गाडी थांबवून त्या महिलेशी संवाद साधला. या महिलेचा प्रश्न समजावून घेऊन ताबडतोब कंपनीला फोन लावून त्या महिलेच्या मुलाला काम देण्याबाबत सूचना केल्या. यानंतर त्या महिलेने एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं