AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टी अनुदान घोटाळा, राज्य सरकार अॅक्शन मोडवर, थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार असल्याच्या झाला तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महत्वाची बैठक पार पडली. आता थेट या घोटाळ्या प्रकरणी एफआयआर दाखल केल्या जाणार आहेत.

अतिवृष्टी अनुदान घोटाळा, राज्य सरकार अॅक्शन मोडवर, थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश
jalna
| Updated on: Aug 09, 2025 | 11:36 AM
Share

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजविणाऱ्या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणीच खेळू नये,असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. जालना येथे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी जालना आशिमा मित्तल, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी एम, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांच्या बैठकीत त्यांनी हा आदेश दिला.

जालना जिल्हात अतिवृष्टी अनुदान घोटाळा

जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून सुमारे 40 कोटींचा घोटाळा तलाठी, लिपिकासह कृषी सहायकांनी केला आहे. या प्रकरणात 17 तलाठ्यांसह 57 महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा करण्यात आली.

एफआयआर दाखल करण्याचे थेट आदेश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार असल्याच्या झाला तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. शुक्रवारी रात्री उशिरा जालना जिल्ह्यातील आमदार बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे, हिकमत उढाण, अर्जुन खोतकर यांनी या घोटाळ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये या प्रकरणात आल्याचे बघायला मिळाले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित बैठक 

तब्बल चार तास या विषयावर बैठक झाली. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आदेश दिले. आता थेट एआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जालन्या जिल्हात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली, आता त्यावर थेट कारवाई ही करण्यात आल्याचे बघायला मिळतंय. एफआयआर दाखल करण्याच्या आदेशानंतर जिह्लात चांगलीच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. हा तब्बल 40 कोटींचा घोटाळा आहे. तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून हा घोटाळा झाला आहे.

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...