Sangli : सांगलीत आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

Sangli : सांगलीत आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल
सांगलीत आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत

राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा सुमारे 150 दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख-दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही. त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 16, 2022 | 3:37 PM

सांगली : आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचाविरुद्ध सांगलीच्या पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आग्रही होऊन समाजातून बहिष्कृत करणाऱ्यांवर कारवाई करण्यासासाठी प्रयत्न केले.

इस्लामपूर येथील प्रकाश भोसले यांनी या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात समाजातील पंचाविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी नंदीवाले समाजाचे पंच विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार (रा. इस्लामपूर), शामराव देशमुख, अशोक भोसले (रा. दुधोंडी), किसन इंगवले (रा.जुळेवाडी) आणि विलास मोकाशी (रा. निमणी) या सहा पंचाविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

30 दाम्पत्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव

राज्यातील नंदीवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा सुमारे 150 दाम्पत्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. बहिष्कृत केलेल्यांना समाजातील सुख-दु:खाच्या प्रसंगी बोलावले जात नाही. त्यांच्याशी संबंध ठेवले जात नाहीत. अशा 30 दाम्पत्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेशी संपर्क साधून बहिष्कार उठविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

जात पंचायतीला समजावूनही बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय

अंनिसने काही पंचांशी संपर्क साधून हा प्रकार बेकायदा असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी बहिष्कार मागे घेत असल्याचेही कबूल केले. मात्र, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे 9 जानेवारी रोजी झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने गुन्हा दाखल करावा लागल्याचे पीडित प्रकाश भोसले यांनी सांगितले. (150 couples expelled due to inter-caste marriage in Sangli, filed a case against six nandiwale caste judges of the community)

इतर बातम्या

KDMC Crime | प्राणघातक हल्ल्यात व्यापारी जखमी, भाजपच्या माजी नगरसेवकास बेड्या

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें