परतीच्या पावसात 25 हजार क्विंटल मिरची भिजली, व्यापाऱ्यांचे इतक्या कोटीचं नुकसान

आताच्या हंगामात आतापर्यंत 25 हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली.

परतीच्या पावसात 25 हजार क्विंटल मिरची भिजली, व्यापाऱ्यांचे इतक्या कोटीचं नुकसान
व्यापाऱ्यांचे इतक्या कोटीचं नुकसान
Image Credit source: tv 9
जितेंद्र बैसाणे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Oct 19, 2022 | 4:44 PM

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत पंचवीस हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली. ही मिरची वाळविण्यासाठी मिरची पठारांवर टाकली जाते. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे वीस हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची पावसाच्या पाण्यात सापडली. दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. असं बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आताच्या हंगामात आतापर्यंत 25 हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाली. मिरची वाढवण्यासाठी पठारांवर टाकण्यात आली होती. मिरची वाढण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागतो.

मात्र रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे मिरची पावसात भिजून व्यापाऱ्यांचे जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास दोन ते अडीच कोटीच्या घरात नुकसान असल्याचा अंदाज नंदुरबार बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केला आहे.

परतीच्या पावसामुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आजही परतीचा पाऊस झाला. व्यापाऱ्यांचे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक सुरू झाली. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली होती. मात्र अचानक झालेल्या पावसाने व्यापाऱ्यांना मोठा फटका दिल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे.

मिरची हे महत्त्वाचं पीक आहे. पण, मिरची गेल्यामुळं तिखट महागण्याची चिन्हं आहेत. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. ही भरपाई कशी करायची, असा प्रश्न आता व्यापाऱ्यांना पडला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें