Kolhapur News : मुसळधार पावसामुळे मातीची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत.

Kolhapur News : मुसळधार पावसामुळे मातीची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापुरमध्ये भिंत कोसळून महिला ठारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 2:30 PM

कोल्हापूर / 27 जुलै 2023 : राज्यात पावसाने थैमान घातले आहे. कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात घडली आहे. आजरा तालुक्यातील किणे येथे भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर महिलेचा पती आणि अन्य महिला जखमी झाले आहेत. सुनीता अर्जुन गुडूळकर असे मयत महिलेचे नाव आहे. तर अर्जुन गुडूळकर आणि वत्सला परसु गुडुळकर अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असतानाच महिलेचा मृत्यू

किणे येथे प्राथमिक शाळेसमोर गुडुळकर यांचे घर आहे. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुनीता गुडुळकर या गोठ्यात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घराची मातीची भिंत कोसळली. ही भिंत गोठ्याच्या चिऱ्याच्या भिंतीवर कोसळल्याने ती भिंतही कोसळली. या भिंतीखाली दबल्याने सुनीता गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर त्यांचे पती आणि अन्य एक महिला यात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

संरक्षक भिंत अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

याआधी खासबाग मैदान संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. संध्या तेली असं मृत महिलेचे नाव आहे. मृत महिला करवीर तालुक्यातील वडणगे गावची रहिवासी आहे. एका कार्यक्रमासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आली असताना या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.