Chandrapur Murder : आईचे अनैतिक संबंधात बिनसले, मुलाने प्रियकरालाच संपवले; चंद्रपूरमध्ये हत्या करुन तरुणाला पडक्या इमारतीत फेकले

राजुरा शहरातील राहुल ठक हा तरुण चंद्रपुरात एका रुग्णालयात चालक म्हणून कामाला होता. तिथेच त्याची ओळख रुग्णालयात कामाला असलेल्या एका महिलेशी झाली. या दोघांचे काही काळ मधुर संबंध होते. नंतर मात्र त्यात वितुष्ट आले. यातूनच महिलेचा मुलगा व त्याच्या 2 मित्रांनी राहुलला दारू पाजून घटनास्थळी नेत मिळून हत्या केल्याचे उघड झाले आहे.

Chandrapur Murder : आईचे अनैतिक संबंधात बिनसले, मुलाने प्रियकरालाच संपवले; चंद्रपूरमध्ये हत्या करुन तरुणाला पडक्या इमारतीत फेकले
आईचे अनैतिक संबंधात बिनसले, मुलाने प्रियकरालाच संपवले
Image Credit source: TV9
निलेश डाहाट

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 15, 2022 | 10:19 PM

चंद्रपूर : अनैतिक संबंधात वितुष्ट निर्माण झाल्याने एका तरुणाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने आईच्या प्रियकरा (Boyfriend)चा काटा काढल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. राहुल ठक (25) असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या मयताचे नाव असून तो राजुरा येथील रहिवासी आहे. हत्येनंतर सेलो टेपने हात पाय बांधलेला राहुलचा मृतदेह एका पडक्या शासकीय इमारतीत फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत तिघा आरोपींना अटक (Arrest) केली आहे. वैभव डोंगरे, संदीप बरलेवार, कार्तिक बावणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मृतदेह आढळल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामाला वेग दिला होता.

हत्या करुन पडक्या इमारतीत टाकला मृतदेह

चंद्रपूर शहरातील जुबिली हायस्कूल परिसरात असलेल्या पडक्या शासकीय इमारतीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळला होता. इमारतीच्या वर त्याची हत्या करून सेलो टेपचया सहाय्याने हात-पाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत हा मृतदेह मंगळवारी रात्री आढळला होता. रात्री घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासकामाला वेग दिला होता. फॉरेन्सिक आणि सायबर टीमच्या सहाय्याने युवकाच्या हत्येचा उलगडा करण्यात आला. पोलिसांनी युवकांची ओळख पटवून विविध पथके तयार करत हत्येमागचे कारण उलगडले आहे.

राजुरा शहरातील राहुल ठक हा तरुण चंद्रपुरात एका रुग्णालयात चालक म्हणून कामाला होता. तिथेच त्याची ओळख रुग्णालयात कामाला असलेल्या एका महिलेशी झाली. या दोघांचे काही काळ मधुर संबंध होते. नंतर मात्र त्यात वितुष्ट आले. यातूनच महिलेचा मुलगा व त्याच्या 2 मित्रांनी राहुलला दारू पाजून घटनास्थळी नेत मिळून हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हत्याप्रकरणी वैभव डोंगरे, संदीप बरलेवार, कार्तिक बावणे अशा 3 आरोपींना अटक केली आहे. हत्येचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. (A young man was killed in an immoral relationship in Chandrapur)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें