माझ्यासाठी आदित्य ठाकरे टॅक्स फ्री; राणेंचे आदित्य यांना चिमटे आणि सल्ला

चिपी विमानतळाच्या उद्धाटनावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोले लगावतानाच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना चिमटे काढत सल्लाही दिला. (aaditya thackeray is tax free for me, says narayan rane)

माझ्यासाठी आदित्य ठाकरे टॅक्स फ्री; राणेंचे आदित्य यांना चिमटे आणि सल्ला
Narayan Rane

सिंधुदुर्ग: चिपी विमानतळाच्या उद्धाटनावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोले लगावतानाच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना चिमटे काढत सल्लाही दिला. माझ्यासाठी आदित्य ठाकरे हे टॅक्स फ्री आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

नारायण राणे यांनी चिपी विमातळाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना हे टोले लगावले. माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मी शुभेच्छा देईन. उद्धवजींना अभिप्रेत काम करुन दाखवा, मला आनंद वाटेल. सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सर्व आलात आनंद आहे. बरं वाटलं असे चिमटे काढतानाच आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी अभ्यास करावा. त्यांनी टाटाचा रिपोर्ट वाचावा, असा सल्लाही राणेंनी आदित्य यांना दिला.

तुमच्या लोकप्रतिनिधींची माहिती घ्या

स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. प्रोटोकॉल जरुर पाळा. तुम्हाला सर्व माहिती मिळते, ब्रीफ होतेय. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांना थारा नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं ते म्हणाले.

भूमिसंपादनाला कुणी विरोध केला?

उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आज हायवे. अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा. सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिलं. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.

सिंधुदुर्गाचा विकास मीच केला

1990 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती. इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात एक शब्द बोलले : नारायण राणे

‘जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यात राणेंचं योगदान, दुसरा कुणी इथं येऊच शकत नाही’, उद्धव ठाकरेंसमोर राणेंचा हल्लाबोल

राणे मुख्यमंत्र्यांच्या समोर पहिल्यांदाच म्हणाले, उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला

(aaditya thackeray is tax free for me, says narayan rane)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI