अमरावतीच्या कौडण्यपूर येथील रुखमाईच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

अमरावतीच्या कौडण्यपूर येथील रुखमाईच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती
विदर्भातील मानाच्या पालखीचं प्रस्थान

या वर्षी ही पालखी 427 व्या वर्षात प्रदार्पण करीत असताना कोरोनाच्या सावटामध्ये ही पालखी आज 80 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 18, 2021 | 4:10 PM

अमरावती: विदर्भाची पंढरी म्हणून कौडण्यपूरला ओळखलं जातं. प्रतिपंढरपूर म्हणून रुख्मिणीच माहेर अमरावतीच्या कौडण्यपूरला म्हंटलं जातं.आषाढी एकादशीला दरवर्षी रुख्मिणीच्या पादुका घेऊन वारकरी सासरी जातात. 1594 वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोना च्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झालीय. पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिलीय आणि त्यात दहा पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी आहे.

427 व्या वर्षात पदार्पण

या वर्षी ही पालखी 427 व्या वर्षात प्रदार्पण करीत असताना कोरोनाच्या सावटामध्ये ही पालखी आज 80 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. दरवर्षी पायी जाणारी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पालखीला यावर्षी मात्र एसटी महामंडळाच्या बसने माता रुक्मिणीच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाल्या.

आज सकाळी जिल्ह्याच्या पालकमंत्री व राज्याच्या बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंदिरात पादुकाचे पूजन करून माता रुक्मिणीची ओटी सह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून गावातून पालखी काढण्यात आली. अंबिका देवी च्या मंदिरातून श्रीकृष्णने रुक्मिणीचे हरण केले होते अशी आख्यायिका असलेल्या त्या अंबिका मातेच्या मंदिराजवळ पालखीचा पहिला विसावा झाला. त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या समवेत पहिलं रिंगण सुद्धा झालं. यावेळी राज्याच्या बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला.

रुक्मिणीच्या पादुकांसह माता अंबिका देवीच्या सुद्धा पादुका घेऊन गावाच्या वेशीवर टाळ मृदुंगाच्या गजरात वारकर्‍यांनी व गावातील लोकांनी पालखीला निरोप दिला. त्यानंतर मात्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाच्या लालपरीने माता रुक्मिणीची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली यावेळी तालुक्याचे प्रशासकीय यंत्रणा डॉक्टर्स यांनी नियमाचे काटेकोर पालन करावे असे सुद्धा निर्देश संस्थांनला दिले.

मानाचे वारकरी पालखीसोबत गेले त्यावेळेसही वारकऱ्यांची प्रशासनाकडून त्ंयांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पालखी सोहळ्यात जाण्याची परवानगी दिली गेली. सोबतच पोलीस यंत्रणा व आरोग्य सेवा कर्मचारीसोबत ही पालखी पंढरपूरला मार्गस्थ झालीय. रुख्मिणीच्या माहेरवरून येणाऱ्या पालखीला पंढरपूर येथे महत्वाचं स्थान आहे. याठिकाणी माहेरवरून साडीचोळी रुख्मिणीला चढविण्याचा मान असतो.

इतर बातम्या:

लोकसभेतील गटनेतेपदी अधीर रंजन चौधरी कायम; काँग्रेसकडून कुणाला काय जबाबदारी? वाचा सविस्तर

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अ‌ॅलर्ट, विठ्ठल मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

Aashadhi Ekadashi 2021 Vidrabha Amaravati Kodanyapu Rukhimini Palkhi move towards Pandharpur with Presence of Minister Yashomati Thakur

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें