पांडुरंगाच्या 20 वर्षांच्या सेवेचं फळ, मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दांपत्याला मिळाला आहे.

पांडुरंगाच्या 20 वर्षांच्या सेवेचं फळ, मुख्यमंत्र्यासोबत महापूजेचा मान वर्धा जिल्ह्यातील कोलते दांपत्याला
केशव कोलते, मानाचे वारकरी

सोलापूर: आषाढी वारीच्या महापुजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दांपत्याला मिळाला आहे. गेल्या 20 वर्षापासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. हे दांपत्य वर्धा जिल्ह्यातील आहे आज मंदिरातील सहा विणेकऱ्यांमधून चिट्टी टाकून मानाचा वारकरी निवडण्यात आला. कोरोना संसर्गामुळं वारी पांरपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं होण्याऐवजी नियमांसह होत असल्यानं मानाचा वारकरी निवडण्याची परंपरा बदलण्यात आली आहे.

20 वर्षांच्या विठ्ठल सेवेचं फळ

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मानाचा वारकरी कसा निवडतात?

आषाढी वारी दरम्यान मानाचा वारकरी एकादशीच्या दिवशी बारी बंद केली जाते, त्यावेळी दारावर असणाऱ्या वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान दिला जातो. मात्र, कोरोनामुळं मंदीर बंद असल्यानं मंदिराचे सेवेकरी यांच्यात चिट्टी टाकून यंदा निवड करण्यात आली.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी वाखरी पालखी तळाची तयारी पूर्ण

20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून दहा संतांच्या मानाच्या पालख्या या सर्वप्रथम वाखरी येथील पालखीतळावर येणार आहेत. या ठिकाणी दहा पालख्यांना थांबण्यासाठी दहा मंडपाचे काम सुरू आहे. प्रत्येक पालखीतील चाळीस वारकऱ्यांना थांबण्याची आणि भोजनाची सोय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून येथे केली जाणार आहे. तसेच बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युतव्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रुफ मंडप आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली आहे.

सध्या कोरनाचा संसर्ग असल्यामुळे प्रतीकात्मक पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतोय. त्यामुळे वाखरी पालखी तळावर परवानगी असलेल्या व्यक्ती शिवाय कोणालाही प्रवेश असणार नाही. वाखरी येथील पालखी तळाला पहिल्यांदाच लोखंडी बॅरिकेट लावून बंदिस्त केले आहे.तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात, आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वाखरी तळ, विसावा मंदिर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय अशा वेगवेगळ्या 14 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती देखील प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली.

इतर बातम्या

Maharashtra SSC Result 2021 Declared : निकालाच्या वेबसाईट लवकरच पूर्ववत होतील, तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश, वर्षा गायकवाड यांची माहिती

T20 World Cup 2021 : 2014 मध्ये वर्ल्डकप जिंकला, आता स्पर्धेत एण्ट्री मिळवण्यासाठी धडपड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI