AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेने सुट्ट्या रद्द केल्या, मग ऑनड्युटीच गोव्याला पोहचले, पण ती एक चूक केली अन्…

जिल्हा बँकेने दोन वर्षात शून्य एनपीओ करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली सुरु आहे. यामुळे बँकेकडून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मात्र प्रशासनाचा आदेश जुगारुन पिकनिक करणे काही अधिकाऱ्यांना महागात पडले.

बँकेने सुट्ट्या रद्द केल्या, मग ऑनड्युटीच गोव्याला पोहचले, पण ती एक चूक केली अन्...
ऑनड्युटी पिकनिकला जणाऱ्या आठ बँक अधिकाऱ्यांवर कारवाईImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 30, 2023 | 10:54 AM
Share

सांगली : बँकेने सुट्ट्या रद्द केल्या असल्याने ऑनड्युटी गोव्याला पिकनिकला जाणे आठ अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांची बदली केली आहे. मार्केड यार्ड शाखेचे आर.टी. नाटेकर, बी.आर. दुधाळ, उमराणी शाखेतील एस.ए. कांबळे, उमदी शाखेतील एस.एम. सोलनकर, एम.एम. मुल्ला, एम.एम. पाटील, एस.एम. तेली आणि दरीबडची शाखेतील ए.यू. वाघमारे अशी कारवाई झालेल्या आठ अधिकाऱ्यांची नावे आहेत. शिराळा तालुक्यातील बँकेच्या विविध शाखांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. पिकनिकचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर बँकेने ही कारवाई केली.

कर्जवसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या रद्द केल्या

पुढील दोन वर्षात एनपीए शून्य टक्के करण्याचा निर्धार जिल्हा बँकेने केला असून, यासाठी शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाला ओटीएस योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी एकरकमी परतफेड योजना राबवत जून अखेरपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सीईओ शिवाजीराव वाघ यांनी दिले होते. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाधिक कर्जवसुली व्हावी यासाठी बँकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक रजाही रद्द केल्या आहेत.

प्रशासनाचा आदेश जुगारुन गोवा गाठले

बँकेच्या आदेशाप्रमाणे सर्व अधिकारी, कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही काम करत आहेत. असे असताना वरील आठ कर्मचाऱ्यांनी सीईओचा आदेश जुगारुन गोवा गाठले आणि तीन मस्त मजा केली. मात्र एक चूक त्यांना महागात पडली. गोव्याचे पिकनिकचे फोटो त्यांनी बँकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले. यानंतर हे फोटो सीईओंपर्यंत पोहचले आणि सर्वांना कारवाईला सामोरे जावे लागले. प्रशासनाच्या आदेशानंतरही आठ अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी, रविवारी बँकेला असलेल्या सुटीला लागून एक रजा टाकली आणि गोव्यात गेले.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.