“चांगला निर्णय हाच असेल की 2024 पर्यंत शरद पवार नेतृत्व करतील”; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजूनही पवारांवरच विश्वास

योद्धा जर ताकदवार ठेवायचा असेल तर सेनापतीने पळून जायचं नसते, त्यामुळे तुम्ही जर निर्णय वापस नाही घेतला तर आमचा राजीनामा स्वीकार कराअशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

चांगला निर्णय हाच असेल की 2024 पर्यंत शरद पवार नेतृत्व करतील; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजूनही पवारांवरच विश्वास
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:37 PM

परभणी : शरद पवार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षातील अनेक नेत्यांना धक्का बसला आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांनी त्यांना विनंतीही करण्यात आली.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी चालू झाली असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व शरद पवार यांनीच करावे अशी इच्छा व्यक्त करत त्यांनी 2024 पर्यंत शरद पवार हेच नेतृत्व करतील अशी इच्छाही व्यक्त केली आहे. मात्र माजी आमदार विजय गव्हाणे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीतील अस्वस्थता आता आणखी दिसून येऊ लागली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आताही राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय गव्हाणे यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शरद पवार यांना पत्राद्वारे त्यांनी निर्णय माघारी घेण्याचे आवाहनही गव्हाणे यांनी केले आहे. दरम्यान, गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भावना व्यक्त करताना म्हणाले की, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपेक्षा राज्याला गरज आहे.

त्याचबरोबर पक्षाला नवीन नेतृत्व द्यायची गरज आहे. त्याचबरोबर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी तुमची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे तुमच्याशिवाय तरुण पिढी हे कार्य पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या कोणा तरुण कार्यकर्त्याला कार्याध्यक्ष करा, मात्र अध्यक्ष पद मात्र तुमच्याकडेच ठेवा, नाहीतर पुरोगामी विचाराची वज्रमूठ यांच्यात खंड पडेल अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी आमदार विजय गव्हाणे यांनी सांगितले की, आगामी काळातील निवडणुका जिंकायच्या असतील तर शरद पवार यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. जर 2024 मध्ये जातीयवाद यांचा खात्मा करूनच शरद पवार यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे.

त्यामुळे शरद पवार यांचा चांगला निर्णय हाच असेल की 2024 पर्यंत शरद पवार हेच पक्षाचे नेतृत्व करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला.

योद्धा जर ताकदवार ठेवायचा असेल तर सेनापतीने पळून जायचं नसते, त्यामुळे तुम्ही जर निर्णय वापस नाही घेतला तर आमचा राजीनामा स्वीकार कराअशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.