दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; चौकशी समिती बदला, खासदार नवनीत राणा नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी वनखात्यानं गठित केलेल्या चौकशी समितीऐवजी दुसरी चौकशी समिती तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; चौकशी समिती बदला, खासदार नवनीत राणा नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार
दीपाली चव्हाण नवनीत राणा
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 4:08 PM

अमरावती: खासदार नवनीत राणा यांनी आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी वनखात्यानं गठित केलेल्या चौकशी समितीऐवजी दुसरी चौकशी समिती तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील हरिसाल व्याघ्रप्रकल्पाच्या आर.एफ.ओ दीपाली चव्हाण आत्महत्ये प्रकरणी वनखात्याने गठीत केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम. के.राव यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अहवाल वन विभागाला सादर केला होता. समितीचे अध्यक्ष एम.के.राव यांनी निलंबित वन अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना क्लीनचिट दिली असल्याची माहिती होती. अमरावतीच्या खासदार नवनीत राना यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

नव्या चौकशी समितीसाठी मोदींना पत्र लिहिणार

खासदार नवनीत राणा यांनी चौकशी समिती बदलण्याची मागणी केली आहे. वन विभागानं सध्या जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या समिती मधील सदस्य हे श्रीनिवास रेड्डी यांच्यासोबत काम केलेले आहेत. ही चौकशी समिती दीपाली चव्हाणला न्याय देऊ शकत नाही, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा या केंद्रीय मंत्र्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करणार दुसरी समिती नेमण्याची मागणी करणार असल्याचं नवनीत राणा यांना सांगितलं आहे.

दीपाली चव्हाण यांची मार्च महिन्यात आत्महत्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे सुसाईड नोट लिहिण्यात आली होती. संबंधित सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

चित्रा वाघ यांचीही आक्रमक भूमिका

चित्रा वाघ यांनी देखील दीपाली चव्हाण आत्महत्ये प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर  ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले होते. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे हरामखोर DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला, तिला अपमानित केल जात होतं, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते.

इतर बातम्या:

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यावर धक्कादायक आरोप

Amaravati MP Navneet Rana will wrote letter to Narendra Modi for change inquiry committee of Deepali Chavan Suicide case

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.