नारायण राणेंच्या अटकेनंतर उस्मानाबादेत भाजप-सेना आमनेसामने, आमदार, खासदारांमध्ये ट्विटवॉर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यानी जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. राणेच्या अटकेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला फोडणी बसली असून येथील शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये ट्विटर वॉर पेटले. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सरकारवविरोधात ट्विट केल्यानंतर त्याला शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणेंच्या अटकेनंतर उस्मानाबादेत भाजप-सेना आमनेसामने, आमदार, खासदारांमध्ये ट्विटवॉर
KAILAS PATIL JAGJIT SINGH PATIL OMPRAKASH RAJE NIMBALKAR
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:22 AM

उस्मानाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. राणेच्या अटकेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला फोडणी बसली असून येथील शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये ट्विटर वॉर पेटले. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सरकारविरोधात ट्विट केल्यानंतर त्याला शिवसेनेच्या खासदार व आमदारांनी तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका

“जगाला तालिबानपासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका आहे,” असे ट्विट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. तसेच शिवसेना आणि राज्य सरकारवर टीका केली. आमदार पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध ट्विट करून केला. त्या ट्विटला शिवसेनेने उत्तर दिले.

धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र, त्याचा फक्त कौरवांना धोका

तर पाटलांच्या ट्विटचा समाचार शिवसेनेच्या नेत्यांनी ट्विटच्याच माध्यमातून घेतला. “धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे. त्यापासून फक्त कौरवांना धोका आहे. राज्यात तर 105 कौरव आहेत. त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार,” असे ट्विट शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी केले. भाजप आमदारांना कैलास पाटील यांनी कौरवांची उपमा दिली असून त्याला शिवसेनेचा धनुष्यबाणच रोखणार असे सांगत हल्लाबोल केला.

ट्विटर वॉरमध्ये शिवसैनिकाची उडी

या दोन्ही ट्विटनंतर उस्मानाबादमध्ये भाजप आणि शिवसैनिकंमध्ये ट्विटवार रंगले. शिवसैनिकांनी भाजप आमदार पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला शेला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. धनुष्यबाणापासून धोका होता म्हणणारे निवडणुकीत धनुष्यबाण घालून मतांची भीक मागत होते अन् मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश द्यावा म्हणून 4 वेळा लोटांगण घेत होते, अशी टीका शिवसैनिकांनी भाजप आमदार पाटील यांच्यावर केली.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह यांचे ट्विट

“धाराशिवचे रंगा-बिल्ला जोडीला विकास काम करतानाचा आव आणून नळी खाऊ की पोळी खाऊ असे झाले आहे. मोदी लाटेत ओमराजे खासदार व कैलास पाटील हे आमदार झाले. त्यांनी कौरव पांडवांचे उदाहरण देऊ नये. भगवान श्रीरामानेदेखील स्वयंवराच्यावेळी अहंकाररुपी धनुष्य तोडून सत्याचा विजय मिळवला होता,” असे ट्विट भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी केले.  खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांना त्यांनी रंगा-बिल्ला या जोडीची उपमा दिली आहे.

इतर बातम्या :

भाजप अनिल परब यांना कोर्टात खेचणार, राणेंना जामीन मिळाल्यांनतर संघर्ष आणखी पेटणार ?

Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना मोठा दिलासा, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर, आता राणे काय भूमिका घेणार?

Breaking : खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या! बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी

(amid Narayan Rane arrest and granted bail twitter war started between Osmanabad Shivsena and BJP politicians Kailas Patil Omprakash Raje Nimbalkar and Rana Jagjitsingh patil)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.