Amit Deshmukh Birthday : शांत, संयमी नेतृत्वाची विजयी Hat-trick, विलासरावानंतरही कॉंग्रेसचा बालेकिल्ला शाबूत

Amit Deshmukh Birthday : शांत, संयमी नेतृत्वाची विजयी Hat-trick, विलासरावानंतरही कॉंग्रेसचा बालेकिल्ला शाबूत
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य खात्याचे कॅबिनेट मंत्री अमित देशमुख
Image Credit source: tv9

शांत, संयमी आणि धीरगंभीर व्यक्तीमत्व कायम ठेऊन राजकारण करणे म्हणजे तारेवरची कसरतच. शिवाय काळाच्या ओघात हे अधिकच जिकिरीचे झाले आहे. राजकारणाचे स्वरुप कितीही बदलले असले तरी अमित देशमुख यांनी आपल्या स्वभावात आणि तत्वामध्ये सूतभरही बदल न करता लातूरकरांची मने जिंकलेली आहेत. मंत्री अमित देशमुख यांचा जन्म 21 मार्च 1976 रोजी बाभुळगावच्या देशमुख राजकीय घराण्यात झाला. वडिल दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले असले तरी त्यांच्यानंतर अमित देशमुख यांचा राजकीय प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे.

राजेंद्र खराडे

|

Mar 21, 2022 | 6:30 AM

लातूर : शांत, संयमी आणि धीरगंभीर व्यक्तिमत्व कायम ठेऊन राजकारण करणे म्हणजे तारेवरची कसरतच. शिवाय काळाच्या ओघात हे अधिकच जिकिरीचे झाले आहे. राजकारणाचे स्वरुप कितीही बदलले असले तरी अमित देशमुख यांनी आपल्या स्वभावात आणि तत्वामध्ये सूतभरही बदल न करता लातूरकरांची मने जिंकलेली आहेत. (Amit Deshmukh Birthday) मंत्री अमित देशमुख यांचा जन्म 21 मार्च 1976 रोजी (Babhulgaon) बाभुळगावच्या देशमुख राजकीय घराण्यात झाला. वडिल दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले असले तरी त्यांच्यानंतर अमित देशमुख यांचा राजकीय प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. वडिलांचे अकाली निधन, 2014 मध्ये मोदी लाट आणि 2019 विधानसभा निवडणूकीत विरोधकांची वज्रमूठ यांचा कोणताही परिणाम (Amit Deshmukh) अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर झाला नाही. लातूरकरांची नाळ आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळेच विलासरावानंतरही त्यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवला आहे. पक्षावरील निष्ठा आणि लातूर जिल्ह्यातील कॉंग्रेस उभारणीमध्ये त्यांचे योगदान पाहून त्यांना मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांना देण्यात आलेले आहे.

राजकीय क्षेत्रात अशी झाली ‘एंन्ट्री’

मुंबई विद्यापीठात 1997 मध्ये B.E. (Chemical Engeneer) चे शिक्षण घेत असतानाच अमित देशमुख यांनी त्यांच्या नेतृ्त्वाती चुणूक लातूर नगर परिषद निवडणुकीत दाखवली होती. त्यावेळी नगरपरिषदेवर तर कॉंग्रेसचा झेंडा फडकलाच पण अमित देशमुख यांच्या राजकीय प्रवासालाही सुरवात झाली. वयाच्या 19 व्या वर्षापासून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रचार केला. एवढेच नाही तर 1999 मध्ये लातूर लोकसभा निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग नोंदवला होता. या दरम्यानचे त्यांचे कार्य, लातूरकरांच्या मनात त्यांच्या बद्दलची भावना पाहून 2002 ते 2008 मध्ये त्यांच्यावर युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. आणि येथूनच सुरवात झाली राजकीय प्रवासाला.

लातूर शहर मतदार संघात विजयाची ‘हॅट्रिक’

सलग तीन वर्ष एखाद्या मतदार संघाचे नेतृत्व करणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, राजकारणात संधीचे सोनं कसं करायचे याची शिकलण घरातूनच मिळाल्याने आ. अमित देशमुख यांनी 2014 मध्ये मिळालेल्या संधीचे सोने केले. 2014 मध्ये अल्पकाळासाठी त्यांनी राज्य मंत्रिपद मिळाले. जेमतेम 100 दिवसांच्या या प्रवासात त्यांनी 2014 मध्ये होणाऱ्या निवडणुकांचा मार्ग सुखकर करुन ठेवला. मतदार संघातील कामे, जनतेशी नाळ आणि कार्यकर्त्यांची फळी वाढवली. 2014 मध्ये स्व.विलासराव देखमुख यांच्या भावनिक लाटेवर हा विजय मिळाला असल्याची टिका विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, अमित देशमुखांनी टिकाकरांना कधीच उत्तर दिले नाही. एवढेच काय 2019 च्या निवडणुकांमध्ये सर्व विरोधक एकत्र होऊनही त्यांनी कुणाचाच निभाव लागू दिला नाही. पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप रिंगणात असताना या निवडणुकीत वंचितनेही उडी घेतली होती. मात्र, अमित देशमुख यांनी लातूर शहरातून निर्विवाद वर्चस्व तर निर्माण केलेच पण धिरज देशमुख यांना लातूर ग्रामीणचे नेतृत्व बहाल करुन डबल इंजिन जोडले आहे.

संयमी नेतृत्वाला योग्य नियोजनाची जोड

मितभाषी, धीरगंभीर अशी पालकमंत्री अमित देशमुख यांची मतदार संघात ओळख आहे. त्यांच्या याच स्वभावाचा निवडणुकीमध्ये फटका बसेल असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी केल्यानेच दरवेळी त्यांचे अंदाज हे अचूक ठरलेले आहेत. शिवाय एखाद्यावर सोपवलेली जबाबदारी तो कीती सजगतेने पार पाडतोय यावर लक्ष ठेवण्यासाठीही एक टीम काम करीत असते. यावेळी लातूर शहराबरोबरच लातूर ग्रामीणचे नेतृत्वही देशमुख घराण्यातच आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बॅंक आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून वाढलेला जनसंपर्क यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतरही देशमुख घराण्याचा दबदबा जिल्ह्यात कायम आहे.

प्रत्येक निवडणुकीनंतर वाढली जबाबदारी

पालकमंत्री अमित देशमुख हे पदवीचे शिक्षण घेत असतानाच लातूर नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान त्यांनी आपल्यान राजकीय व्यक्तिमत्वाची चूणुक दाखवली होती. 1997 पासूनच ते जिल्ह्याच्या राजकारणात सहभागी झाले होते पण खरी परीक्षा होती ती 2009 च्या विधानसभा निवडणुकीत. वयाच्या 31 व्या वर्षी लातूर शहराला एका तरुण व्यक्तिमत्वाचे नेतृत्व लाभले होते ते आजही कायम आहे. 2014 च्या निवडणुका लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. तर आता ते महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी आहेत.

संबंधित बातम्या :

Devendra Fadnavis : मी ठरवलं की नंबर 1 येतोच, फडणवीसांचं पुन्हा आघाडीला आव्हान, 3 मार्कशीट जूळवून पहिले आल्याचाही टोला

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

सोलापुरातून अजय देवगणला अटक! अजय देवगण सुनके एक्टर समझे क्या? ऊसतोड कामगार कम दरोडेखोर है आपुन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें