अमरावती मनपा, पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, नवनीत राणा, रवी राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

अमरावती मनपा, पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, नवनीत राणा, रवी राणांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
छ.शिवाजी महाराज पुतळा (संग्रहित फोटो, रवी राणा फेसबुक)

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj Statue) यांचा पुतळा बसवला होता.

सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 16, 2022 | 9:30 AM

अमरावती: राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj Statue) यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस (Police) प्रशासनानं आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. काल, रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले व  नंतर हा पुतळा काढण्यात आला.हा पुतळा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलंय. तर, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जिल्ह्यात राजकारण तापलं

रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी 2 दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिवप्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते.

भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची प्रतिक्रिया
अमरावती येथील उड्डाणपूलावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्री पोलिसांनी हटवला. त्यामुळे यात राजकीय वातावरण तापले असून भाजपने देखील यात उडी घेतली आहे.भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. जनभावनेचा अनादर या मोगलाई सरकारने केला असा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला. तर, हिंदूच्या भावना शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर दुखावल्या गेल्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया कुलकर्णी यांनी दिली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला व पुतळा हटवला, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

इतर बातम्या:

SPPU Exam | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच, तारीखही ठरली

America Texas Hostage : अमेरिकेत धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह, बंदूकधाऱ्याचा प्रवेश 4 जण ओलीस,नेमकं काय घडलं?

Amravati municipal corporation and Police remove statue of Chh Shivaji Maharaj from Rajapeth

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें