VIDEO: “संचारबंदी असताना गर्दी करण्यास मनाई केली”, संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला, पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

VIDEO: "संचारबंदी असताना गर्दी करण्यास मनाई केली", संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला, पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड

अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हा प्रकार घडला. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे (Attack on Police by Mob in Sangamner Ahmednagar during corona lockdown).

संगमनेरमध्ये संचारबंदी काळात पोलीस पथक गस्त घालत होतं. मात्र, दिल्ली नाका परिसरात गर्दी जमा झाल्याचं दिसल्याने पोलिसांनी त्यांना गर्दी का केली अशी विचारणा केली. मात्र, जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी 6 जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचाही आरोप होत आहे.

व्हिडीओ पाहा :

दरम्यान, हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत हल्ला केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे. हल्लेखोरांनी यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली.

हल्ल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवलं. तसेच 6 आरोपींसह अज्ञात जमावावर गुन्हा नोंदवण्यात आला.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

पुणे पोलीस फरार गजा मारणेच्या शोधात, मालमत्ता जप्तीसह लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणार

राज्यात आतापर्यंत कोरोनाने 85 पोलिसांचे निधन, 314 ठिकाणी पोलिसांवर हल्ले, 86 पोलीस जखमी

पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ला, पोलिसाचा हातच कापला, 7 जणांना अटक

Attack on Police by Mob in Sangamner Ahmednagar during corona lockdown

Published On - 12:30 am, Fri, 7 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI