Nanded : शेतकऱ्याला शिव्या देणाऱ्या मग्रूर बँक अधिकाऱ्याचं डोकं ठिकाणावरंय का? हा Video पाहून डोकं तापेल!

हदगाव तालुक्यातील तेलंग येथील शेतकरी गोविंदराव हे 50 हजार रुपयांचा चेक वटवण्यासाठी ग्रामीण बॅंकेत गेले होते. मात्र, काही कारणावरुन बॅंक अधिकारी धबाले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. दरम्यान, शेतकरी हे आपले बाजू समजावून सांगते होते तर बॅंक कर्मचारी हा कायम वरच्याच पट्टीत बोलत होता. एवढेच नाही तर मारण्यासाठी तो कॅबिनमधून बाहेरही आला होता.

Nanded : शेतकऱ्याला शिव्या देणाऱ्या मग्रूर बँक अधिकाऱ्याचं डोकं ठिकाणावरंय का? हा Video पाहून डोकं तापेल!
नांदेडमध्ये बॅंक अधिकाऱ्याची शेतकऱ्यास अरेरावी
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 11:07 AM

नांदेड :  (Farmer) शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा, शेतकऱ्यांना दुय्यम वागणूक दिली तर कारवाई अटळ अशी वाक्य केवळ ऐकण्यास चांगली वाटतात. मात्र, प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे नांदेडमधील एका व्हिडीओ तून समोर आले आहे.  (Cheque)धनादेश वटवण्यास गेलेल्या शेतकऱ्याला बॅंक कर्मचाऱ्याने अशी काय अर्वाच्य भाषा वापरली आहे की, त्यामुळे तो (Bank Employee) बॅंक अधिकारी आहे का आणखीन कोणी असाच सवाल उपस्थित होत आहे. एवढेच नाही शेतकऱ्याने प्रतिउत्तर देताच या कर्मचाऱ्याची एवढी मजल की तो थेट शेतकऱ्याच्या अंगावरच गेला होता. मात्र, या सर्व घटनेचे चित्रिकरण हे सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि संबंधित शेतकऱ्याने कर्मचाऱ्याविरोधात तक्रार नोंद केल्यास या धबाले कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचे गाव गाठून माफी मागितली.

नेमकी घटना काय ?

हदगाव तालुक्यातील तेलंग येथील शेतकरी गोविंदराव हे 50 हजार रुपयांचा चेक वटवण्यासाठी ग्रामीण बॅंकेत गेले होते. मात्र, काही कारणावरुन बॅंक अधिकारी धबाले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. दरम्यान, शेतकरी हे आपले बाजू समजावून सांगते होते तर बॅंक कर्मचारी हा कायम वरच्याच पट्टीत बोलत होता. एवढेच नाही तर मारण्यासाठी तो कॅबिनमधून बाहेरही आला होता. पण इतर नागरिकांनी त्यााल अडविले. मात्र, या सर्व घटनेचा व्हिडीओ तयार करण्यात आला. अवघ्या काही वेळामध्ये तो व्हायरलही झाला.

व्हिडीओ व्हायरलमुळे माफीनामा

हदगाव तालुक्यातील ग्रामीण बॅंकेतील एका कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्याला कशा पध्दतीने वागणूक मिळते याचा व्हिडीओ अवघ्या काही वेळेमध्ये सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हयरल झाला की त्यावरील कमेंट पाहून संबंधित अधिकरी धबाले यांना शेतकऱ्याचे गाव गाठून माफी मागावी लागली. गाव येताच तालंग गावचे ग्रामस्थ हे आक्रमक झाले होते पण बॅंक व्यवस्थापक सचिन गायकवाड यांनी मध्यस्ती केल्याने प्रकरण मिटले.

हदगाव पोलीस ठाण्यात तक्रारही

बॅंकेचा खातेदार शिवाय शेतकरी असताना संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्यास समजावून सांगणे गरजेचे होते, पण सर्व शेतकऱ्यांसमोर त्यांनी अशी काय वागणूक दिली की प्रत्येतकाच्या तळपायाची आग मस्तकालाच जाईल. त्यामुळेच शेतरी पांडुरंग यांनीही धबाले यांच्या विरोधात थेट हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.