पावसातच सोयाबीनची पाहणी, हिंगोलीत शेतकऱ्याच्या आखाड्यावर भागवत कराडांकडून पिठलं-भाकरीचा आस्वाद

केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी हिंगोलीत शेतकऱ्यांने जेवणाचा आग्रह केल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता जेवणाचे आमंत्रण स्वीकारले आणि शेतकऱ्याच्या आखाड्यावर पिठलं-भाकरी आणि ठेचाचा आस्वाद घेतला.

पावसातच सोयाबीनची पाहणी, हिंगोलीत शेतकऱ्याच्या आखाड्यावर भागवत कराडांकडून पिठलं-भाकरीचा आस्वाद
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 7:59 AM

हिंगोली : जन आशीर्वाद यात्रेनिमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (17 ऑगस्ट) नांदेड येथील कार्यक्रम आटपून कराड हिंगोलीकडे येत असताना कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर त्यांनी रिमझिम पावसातच सोयाबीनच्या पिकाची पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर कराड वाहनाकडे निघालेले असताना उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला. कराड यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवणाचे आमंत्रण स्वीकारून येथील शेतकऱ्याच्या आखाड्यावर पिठलं-भाकरी आणि ठेचाचा आस्वाद घेतला.

“2 वर्षांपासून ना पीक विमा, ना पीक कर्ज”, केंद्रीय मंत्र्यासमोर शेतकऱ्यांकडून प्रश्नांना वाचा

या दौऱ्यात डॉ. कराड यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून पिक विमा मिळाला का? असा सवाल केला. यावर शेतकऱ्यांनी गेल्या 2 वर्षांपासून पिक विमा मिळाला नाही, वेळेवर पिक कर्ज मिळत नाही अशा व्यथा मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करतात ते तुम्हाला मिळतात का असा प्रश्न कराड यांनी केला. त्यावर आम्हाला ते पैसे मिळतात असे उत्तर शेतकऱ्यांनी दिलं. यावर कराड यांनी समाधान व्यक्त केलं.

“रस्त्यात गेलेल्या शेतीचा भूसंपादन मोबदला बाकी”

काही शेतकऱ्यांचा रस्त्यात गेलेल्या शेतीचा भूसंपादन मोबदला बाकी असल्याचं शेतकऱ्यांनी भागवत कराड यांना सांगितलं. यानंतर मी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन मंत्री डॉ. भागवत कराड यांनी शेतकऱ्यांना दिले. आम्ही पाऊस घेऊन आलोय अशी मिश्किल टिप्पणी मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली. त्यानंतर एकच हशा पिकला.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरु, आर्थिक फटका बसण्याची भीती

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

व्हिडीओ पाहा :

Bhagwat Karad eat in Farmer house during Jan Ashirvad Yatra